मुंबई : राज्यातील धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमातींमध्ये करण्याची जोरदार मागणी होत असतानाच या समाजाला अनुसूचित जातींच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
धनगर समाजाच्या कल्याणासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला जाणार असून, अनुसूचित जमातींसाठीच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शक्तिप्रदत्त समिती स्थापन करण्यात येणार आहे. धनगर समाजासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणि शक्तिप्रदत्त समिती अशी दोन्ही आश्वासने उपमुख्यमंत्री व तत्कालीन वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात दिलेली होती.
समितीमध्ये उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पशू दुग्ध व मत्स्यव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांचा समावेश करण्यात आला आहे.