विक्रमगड: विक्रमगड हायस्कूल व कस्तुरबा गांधी विदयालच्या विद्यार्थींनीनी पोलिस स्थापना दिनानिमित्त रायझिंग-डेचे आयोजन केले होते़. यावेळी विद्यार्थीनींनी बेटी बचाव व पोलिस विभागाचे महत्व या दोन महत्वाच्या विषयांवर घोषणा देत प्रभातफेरी काढली होती. रायझिंग-डे सप्ताहात विद्यार्थींनींना पोलिसदलाबाबत माहिती देण्यात आली़ त्यानुसार विक्रमगड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक विजय शिंदे यांनी विद्यार्थीनींना स्व-संरक्षण कसे करावे? तसेच कायदा व सुव्यवस्था कशी राखावी याचे मार्गदर्शन केले. शासनाकडून मिळणाऱ्या विविध योजनांची व त्याकरीता काय करावे? त्या योजनाचा फायदा कसा घ्यावा याबाबतही मार्गदर्शन केले. कार्यक्रमांस महिला दक्षता समितीच्या पदाधिकारी, हायस्कूल व कॉलेजच्या मुख्याध्यापिका गीतांजली टिळक, पोलिस उपनिरिक्षक पेल्दाम यासह पोलिस हवालदार, कर्मचारी यांची उपस्थिती होती़जव्हारमध्ये पोलिस ‘रायझिंग डे’ सप्ताहजव्हार : महाराष्ट्र पोलीस रायझिंग डे निमित्त महिलांना व विद्यार्थींना स्वंय संरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात आले. हा सप्ताह २ जानेवारी ते ५ जानेवारीपर्यंत होता. या रायझिंग डे सप्ताहाला कार्यक्र माला महिलांनी मोठा प्रतिसाद दिला. सप्ताहानिमित्त उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता तोतवाड, पोलीस निरीक्षक- घनश्याम आढाव, अन्य पोलीस कर्मचारी, व सप्ताह निमित्त आलेल्या महिलावर्ग, विद्यार्थीनी उपस्थित होत्या.
विद्यार्थ्यांना शस्त्रांची माहिती
By admin | Published: January 07, 2017 3:12 AM