आविष्कार देसाई
रायगड : काेराेनाचा प्रादुर्भाव हाेऊ नये, यासाठी मास्क वापरण्याची सक्ती केली जात आहे. मास्क वापरल्याने काेराेनासारख्या महाभयंकर राेगला राेखता येते, तसेच अन्य विषाणूजन्य आजारापासून आपले संरक्षणही हाेत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट हाेत आहे. त्यामुळे काेराेनासह अन्य राेगाला परतावून लावण्यासाठी मास्क वापरणे एक प्रकारे नागरिकांसाठी वरदान ठरत आहे.काेराेना विषाणूचा फैलावाने अख्या जगाला चांगलाच हादरा दिला आहे. काेट्यवधी नागरिकांना काेराेनाची लागण झाली, तर लाखाे नागरिकांचा काेराेनाेने बळी घेतला आहे. काेराेना विषाणूचा फैलाव हा नाका-ताेंडावाटे शरीरात हाेत असल्याने मास्कचा वापर करणे सरकारने बंधनकारक केले आहे. आराेग्य विभागही मास्क वापरणे गरजेचे असल्याचे सातत्याने सांगत आहे.
मास्कमुळे काेराेनाचा फैलाव राेखला जाताेय, शिवाय सर्दी, खाेकला, टीबी, त्याचप्रमाणे ॲलर्जी, दमा यांसारख्या राेगांनाही राेखण्याचे काम मास्कमुळे हाेत आहे. २०१९ या कालावधीत जिल्हा सरकारी रुग्णालयात ऑक्टाेबर आणि नाेव्हेंबर या कालावधीत सुमारे एक हजार २०० नागरिक उपचारासाठी आले हाेते, तर ऑक्टाेबर आणि नाेव्हेंबर, २०२० या कालावाधीत फक्त ४८0 नागरिक उपचारासाठी आल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.
मास्कने अनेक साथीच्या आजारांना घातला आळाथंडीच्या दिवसामाध्ये प्रामुख्याने सर्दी, खाेकला, दमा, साथीचे ताप हे आजार डाेके वर काढतात. मात्र, काेराेनाच्या भीतीमुळे नागरिक मास्कचा वापर करत आहेत. त्यामुळे वातावरणातील विषाणूंना अटकाव केला जात आहे. त्याचप्रमाणे, प्रत्येकाची प्रतिकारशक्ती तेवढीच महत्त्वाची आहे. यासाठी पाेषक आहार घेणे गरजेचे आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.
विषाणूजन्य आजारसर्दी, खाेकला, ताप, टीबी, दमा असे विविध विषाणूजन्य आजार आहेत, हे आजार हवेतून सहज पसरतात. नाका-ताेंडाला मास्क नसेल, तर ते मानवाच्या शरीरात प्रवेश करु शकतात. त्यामुळे संबंधिताला विषाणूजन्य आजाराची बाधा निर्माण हाेऊ शकते. यासाठी मास्क वापरणे हा खरच चांगला उपाय आहे. काेराेनाबराेबर अन्य विषाणूजन्य आजाराला राेखण्याचे प्रभावी हत्यार आहे.
थंडीच्या हंगामामध्ये प्रामुख्याने सर्दी, खाेकला, दमा, साथीचा ताप असे आजार डाेके वर काढतात. हे विषाणू हवेतून सहज पसरून मानवीच्या शरीरातमध्ये प्रवेश करतात. ज्यांची प्रतिकारशक्ती सक्षम असते, ते त्या विषाणूचा मुकाबला करतात. मात्र, अन्य जणांना या आजाराचा सामना करावा लागताे. मास्क वापरल्याने आजाराचा धाेका कमी असताे. -डाॅ. राजीव तांबाळे, जिल्हा रुग्णालय, रायगड