नाशिक : महाराष्ट्रातील शेती विकासासाठी पारंपरिक शेतीपासून आधुनिक शेतीकडे जाणे आवश्यक आहे. यासाठी तंत्रज्ञान स्वीकारण्यात आपण किती तयार आहोत? शेतकऱ्यांसमोरील आव्हाने कोणती आहेत?, नावीन्य आणि तंत्रज्ञानाचा अवलंब करून महाराष्ट्रातील शेतीचा आराखडा कसा बदलता येर्ईल, आदी विविध घटकांवर प्रकाशझोत टाकण्यासाठी लोकमततर्फे मंगळवारी (दि. १६) वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे.बसंत अॅग्रोटेक लि. आणि सीएट स्पेशालिटी टायर्स यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी ११ वाजता हा वेबिनार होणार असून त्यात विशेष प्रमुख अतिथी म्हणूनराज्याचे कृषिमंत्री दादा भुसे, तर प्रमुख अतिथी म्हणून कृषी आयुक्त सुहास दिवसे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.देशाच्या अर्थव्यवस्थेला सर्वात मोठा वाटा देणारे महाराष्ट्र राज्य कृषीच्या बाबतीतही अग्रेसर आहे. हवामान स्थितीत आणि शेती उत्पादनांमध्ये वैविध्य असून, आव्हानेदेखील मोठी आहेत. अशात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. कारण त्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यातच कोरोनाचा देशातील अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. अर्थात यावर्षी हवामान खात्याने पावसाळ्याबद्दल चांगले अंदाज वर्तविले आहेत, ही जमेची बाजू असून, या काळात तंत्रज्ञान एक आशेचा किरण म्हणून उदयास येत आहे. हाय-टेक ड्रोन, विविध प्रकारची माहिती व विश्लेषणे, एआय आणि उपग्रह प्रतिमांचा वापर पुढे येत आहे. बियाणे, खते व पीक संरक्षण उत्पादनांमधील नवकल्पनामुळे शेती बाजाराचे भविष्य बदलत आहे. अलीकडेच केंद्र तसेच महाराष्ट्र सरकारने कृषी निर्यातीला चालना देण्याच्या धोरणासह थेट शेतकºयांना जास्तीत जास्त पैसे कसे मिळतील यासाठी अनेक घोषणा केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर कृषी क्षेत्राबद्दल अधिक चर्चा व्हावी आणि शेतकºयांचे प्रबोधन व्हावे, या उद्देशाने या वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे.यांचे लाभणार मार्गदर्शन शेतकरी बांधवांसाठी खास आयोजित या वेबिनारमध्ये महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे संस्थापक विजय जावंधिया, रूरल रिलेशन्स संस्थेचे संस्थापक प्रदीप लोखंडे, बियाणे उद्योग महासंघाचे कार्यकारी संचालक डॉ. शिवेंद्र बजाज, बसंत अॅग्रोटेक लिमिटेडच्या सीड्स डिव्हिजनचे नॅशनल मार्केटिंग हेड चंद्रशेखर पारखी, सीएट स्पेशालिटी टायर्सचे एम. डी. विजय गंभीरे, सह्याद्री फार्मस्चे व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे शेतीविषयातील विविध घटकांवर मार्गदर्शन करणार आहेत.या वेबिनारमध्ये नाव नोंदणी करण्यासाठी https://bit.ly/LokmatAgro या लिंकचा वापर करावा.अथवा +91 8108469407 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर नाव, गाव, जिल्हा व मोबाइल नंबर कळविल्यास त्यावर लिंक पाठविली जाईल.नाव नोंदणी करण्यास अडचण आल्यास marleen.dsouza@lokmat.com यावर मेल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
‘आधुनिक शेती : महाराष्ट्राचे भविष्य’ विषयावर वेबिनार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2020 1:46 AM