मुंबई : सहा दिवसांऐवजी पाच दिवसांचा आठवडा केला तर दररोज पाऊणतास जादा काम करण्याची तयारी राजपत्रित अधिकारी महासंघाने सरकारला दिलेल्या प्रस्तावात दर्शविली आहे.
सध्याची कार्यालयीन वेळ ही सकाळी ९.४५ ते सायंकाळी ५.३० अशी आहे. त्याऐवजी सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ अशी कार्यालयीन वेळ असावी, असे महासंघाने मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. तसे केल्यास अधिकारी, कर्मचारी दररोज ८ तास म्हणजे ४८० मिनिटे काम काम करतील.
आठवड्याचे १७६ तास काम होईल आणि वर्षभरातील कामाचे तास २११२ असतील. सध्या सहा दिवसांचा आठवडा असूनही २०८८ तास कामकाजाचे असतात. सध्या दरदिवशी ७ तास १५ मिनिटे कामकाज होते, याकडे महासंघाने लक्ष वेधले आहे.वर्षाकाठी वाढतील २४ तासपाच दिवसांचा आठवडा केल्यास दोन दिवस व वर्षभरातील २४ दिवस कमी होतील, पण दररोज कामाचा ४५ मिनिटांनी वाढल्याने एका महिन्यात कामाचे दोन तास व वर्षाकाठी २४ तास वाढतील, असे महासंघाने म्हटले आहे.