शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
2
"मुख्यमंत्री नाही, पण ५ मिनिटांसाठी तरी पंतप्रधान होणार", महादेव जानकरांनी व्यक्त केला विश्वास 
3
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
4
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा
5
Basmath Vidhan Sabha 2024: दोन राष्ट्रवादीत लढत! जयप्रकाश दांडेगावकर vs राजू नवघरे रिंगणात... गुरूच्या विरोधात शिष्य!
6
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
7
शाळांच्या सुट्टीबद्दल शिक्षण आयुक्तालय आणि महापालिकेचा परस्परविरोधी निर्णय
8
'मुन्नाभाई MBBS'मधला स्वामी आता दिसतो खूपच वेगळा, लेटेस्ट फोटो पाहून चाहते झाले अवाक्
9
Fact Check: 'जर्सी नं. 7' धोनीच्या सन्मानार्थ RBI ७ रुपयांचं नाणं आणणार?; व्हायरल दाव्यामागील सत्य वेगळंच
10
Maharashtra Election 2024 Live Updates: महाराष्ट्राची निवडणूक ही विचारसरणीची निवडणूक- राहुल गांधी
11
खासगी विमान, ३० हून अधिक लक्झरी कार्स, परदेशात मालमत्ता; नायजेरियाच्या राष्ट्रध्यक्षांची संपत्ती किती?
12
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
13
ऑनलाइन तेल पडले महागात! अमेरिकेत मुलाची केस गळती, वाशीतल्या वडिलांना लाखोंचा गंडा
14
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
15
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
16
Sankashti Chaturthi 2024: तुमचा आज संकष्टीचा उपास आहे? जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ आणि नियम!
17
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
19
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 

आठवड्याभरात चौपाट्यांवर जीवरक्षक नेमा

By admin | Published: June 11, 2016 6:35 AM

चौपाट्यांवर एका आठवड्यात जीवरक्षक, बोट आणि गस्ती वाहन उपलब्ध द्या, असे निर्देश शुक्रवारी उच्च न्यायालयाने सरकारला दिले.

मुंबई : पर्यटकांचे चौपाट्यांजवळ बुडून होणारे मृत्यू रोखण्यासाठी तातडीची उपाययोजना म्हणून राज्यभरातील सर्व चौपाट्यांवर एका आठवड्यात जीवरक्षक, बोट आणि गस्ती वाहन उपलब्ध द्या, असे निर्देश शुक्रवारी उच्च न्यायालयाने सरकारला दिले. तसेच याची अंमलबजावणी केल्याचा अहवाल सादर करा, अन्यथा २१ जूनच्या सुनावणीत कठोर भूमिका घेऊ, अशी तंबीही या वेळी दिली.रायगड जिल्ह्यातील मुरुड येथे पुण्याहून सहलीला आलेल्या १३ विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना फेब्रुवारीमध्ये घडली होती. त्यामुळे चौपाट्यांवरील पर्यटकांच्या सुरक्षेबाबत जनहित मंच या स्वयंसेवी संस्थेने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावरील सुनावणीच्या वेळी न्यायालयाने हे निर्देश दिले. राज्यातील चौपाट्या सुरक्षित ठेवण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निर्देशांच्या आधारे राज्य सरकारने ने २००६ मध्ये अधिसूचना काढली होती. या अधिसूचनेची आतापर्यंत रखडलेली अंमलबजावणी करण्यासही उच्च न्यायालयाने या वेळी बजावले. (प्रतिनिधी) >अधिसूचनेप्रमाणे एकही सुविधा नाही!गेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने पर्यटनासाठी खुल्या असलेल्या चौपाट्या ज्या जिल्'ात आहेत, तेथील जिल्हाधिकाऱ्यांना चौपाट्यांवरील सुविधांची माहिती देण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार रत्नागिरीत १९ चौपाट्या असून आतापर्यंत २००६ च्या अधिसूचनेमध्ये नमूद करण्यात आल्याप्रमाणे एकही सुविधा येथे उपलब्ध करण्यात आली नाही, असे रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयाला सांगितले.