शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
10
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
11
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
12
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
13
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
14
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
15
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
16
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
18
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
19
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
20
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू

वीकेण्ड प्रचार जोरात

By admin | Published: October 05, 2014 12:44 AM

निवडणुकीच्या प्रचाराचा जोर वाढत असून ‘वीकेण्ड’मध्ये प्रचार वाढवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्लॅनिंग केले आहे.

मुंबई : निवडणुकीच्या प्रचाराचा जोर वाढत असून ‘वीकेण्ड’मध्ये प्रचार वाढवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्लॅनिंग केले आहे. 5 ऑक्टोबर रविवार आणि त्यानंतर येणारा शेवटचा रविवार असल्याने प्रचारसभा, रॅली आणि रोड शोवर भर देतानाच जास्तीत जास्त मतदारांर्पयत पोहोचण्याचा प्रयत्न असणार आहे. 
शनिवार आणि रविवार या दिवशी खासगी तसेच सरकारी कार्यालयांना सुटी असल्याने मतदार घरीच असल्याची संधी साधत घरोघरी पोहोचून उमेदवारांकडून प्रचार केला जातो. या सुटीच्या दिवशी जास्तीत जास्त मतदारांर्पयत पोहोचण्यासाठी आता उमेदवारांकडे 5 ऑक्टोबर आणि त्यानंतर येणारा 11 आणि 12 ऑक्टोबर असे तीन दिवस आहेत. तर 13 ऑक्टोबरच्या संध्याकाळी पाच वाजेर्पयत प्रचाराची अखेर होणार आहे. त्यामुळे हे तीनही दिवस उमेदवारांसाठी धावपळीचे असणार आहेत. 
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपा आणि मनसेकडून या वीकेण्डमध्ये उमेदवारांर्पयत पोहोचण्यासाठी बरेच नियोजन करण्यात आले आहे. अनेकांनी रॅली काढण्यावर सर्वाधिक भर दिला आहे. काँग्रेस, मनसे आणि भाजपा यात आघाडीवर आहेत. त्याचप्रमाणो शनिवार आणि रविवारी अनेक सोसायटय़ांमध्येही छोटय़ा-छोटय़ा सभा घेऊन उमेदवारांर्पयत पोहोचण्याचे नियोजनही करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
 
5 ऑक्टोबरचा रविवार आणि त्यानंतर येणारा शनिवार आणि रविवार हा खूपच धावपळीचा आहे. या तीन सुटय़ांच्या दिवशी काँग्रेसचे सर्वच उमेदवार पदयात्र, रॅली, रोड शोमध्ये व्यस्त असतील. आम्ही बोरीवली ते चर्चगेट अशा मोठय़ा रॅलीचे आयोजन केले आहे. तर मानखुर्द, कलिनामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचारसभांचे नियोजन केले जात आहे. आम्ही रिडेव्हलपमेंट, डीम्ड कन्व्हेअन्ससारख्या विषयांवर चर्चेसाठी सोसायटय़ांमधील रहिवाशांशी संवादही साधणार आहोत. तर पुढील शनिवार आणि रविवारी प्रचारसभेसाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांना निमंत्रित केले आहे. 
- जनार्दन चांदुरकर (काँग्रेस - मुंबई अध्यक्ष)
 
वीकेण्डला घरोघरी प्रचार करण्यावर अधिक भर देणार आहोत. या दिवशी प्रत्येकाशी जनसंपर्क साधण्यासाठी घरोघरी प्रचार करण्याचा एकमेव पर्याय आहे.
- नवाब मलिक (राष्ट्रवादी काँग्रेस - प्रवक्ते)
 
यंदा प्रचारासाठी कमी कालावधी मिळाला. त्यामुळे मतदारांर्पयत पोहोचणो फारच कठीण झाले. हे पाहता वीकेण्डमध्ये जास्तीत जास्त मतदारांर्पयत पोहोचणो हाच एकमेव पर्याय आहे. त्यामुळे शनिवार आणि रविवारी आम्ही  मुंबईतील शहर आणि उपनगरात रॅली आणि घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर सर्वाधिक भर दिला आहे. 
- केशव उपाध्ये (भाजपा - प्रवक्ता)
 
आमच्या उमेदवारांनीही रॅलींचे आणि सोसायटय़ांमध्ये छोटय़ा संभाचे आयोजन केले आहे. 5 सप्टेंबरचा रविवार आणि त्यानंतर येणारा शनिवार-रविवार हाच वीकेण्ड मिळत असून प्रत्येक मतदाराला भेटण्याचा हाच दिवस आहे. 
- बाळा नांदगावकर (मनसे - उपाध्यक्ष)