ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 18 - विमान प्रवास करणा-यांसाठी हा आठवडा अडचणींचा असणार आहे. मुंबई विमानतळाच्या मुख्य धावपट्टीची डागडुजी करण्यासाठी 18 ते 23 ऑक्टोबरपर्यंत चार-चार तासांसाठी बंद असणार आहे. यामुळे 2100 पेक्षा जास्त फ्लाइट्सवर याचा परिणाम होणार आहे.
आज देखील 12 ते 4 वाजेपर्यंत मुख्य धावपट्टी बंद करण्यात आली होती. मुख्य धावपट्टी बंद असताना पर्यायी धावपट्टीचा वापर करण्यात येणार आहे.
याशिवाय 31 ऑक्टोबर आणि 3,7,10,14,17,21,24 आणि 28 नोव्हेबरला धावपट्टी पुर्णतः बंद असणार आहे. मुंबई विमानतळाच्या अधिका-यांनी याबाबत माहिती दिली . या दरम्यान विमानांच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे.