शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

वेरूळ लेणीकडे पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष

By admin | Published: April 18, 2016 1:30 AM

भारतीय शिल्पकलेचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून वेरूळ लेणीकडे पाहिले जाते. युनेस्कोने १९८३मध्ये अजिंठा व वेरूळ लेणी जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले. मात्र, मागील

- मुजीब देवणीकर,  औरंगाबादभारतीय शिल्पकलेचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून वेरूळ लेणीकडे पाहिले जाते. युनेस्कोने १९८३मध्ये अजिंठा व वेरूळ लेणी जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले. मात्र, मागील काही वर्षांपासून केंद्रीय पुरातत्व विभागाकडून या लेण्यांकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने जगप्रसिद्ध वारशाची दुरवस्था होत चालली आहे.औरंगाबाद शहरापासून अवघ्या ३० कि.मी.वरील खुलताबाद तालुक्यात वेरूळ गाव वसले आहे. सरळ रेषेत वसलेल्या एकूण ३४ लेण्यांमध्ये बौद्ध चैत्य दालने, प्रार्थना गृहे, विहार किंवा आश्रम, तसेच हिंदू आणि जैन मंदिरे यांचा समावेश आहे. पाचव्या शतकापासून ते अकराव्या शतकापर्यंत लेणी कोरण्यात आल्या आहेत. केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारित असलेल्या या लेण्यांच्या देखभाल, दुरुस्तीकडे अजिबात लक्ष दिले जात नाही. येथील कोरीव कामांच्या सुरक्षेसाठी कोणत्याच उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत.दोन महिन्यांपूर्वी एका चित्रपटाचे चित्रीकरण या परिसरात करण्यात आले. कलाकार येथील विविध मूर्र्तींवर बसून शूटिंग करीत होते, हा प्रकार धक्कादायकच होता. त्यापूर्वी लेणी परिसरातील अवैध उपाहारगृहात झालेल्या सिलिंडरच्या स्फोटाने संपूर्ण परिसर हादरला होता. या स्फोटामुळे लेणींना तडा गेल्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला होता. जागतिक वारसा दिनानिमित्त वेरूळ लेणीत ‘लोकमत’ प्रतिनिधीने फेरफटका मारला असता, अत्यंत विदारक चित्र पाहायला मिळाले. ३४ लेणींमधील अनेक मूर्र्तींचे हात-पाय गायब झाले आहेत. लेणींच्या प्रवेशद्वाराजवळील हत्तींचीही तोडफोड झाली आहे.वेरूळ, अजिंठा व इतर पर्यटनस्थळांची सोईस्करपणे वाट लावण्याचे काम केंद्रीय पुरातत्व, राज्य पुरातत्व आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ करीत आहे. पर्यटन वाढावे या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना करण्यात येत नाहीत. अनमोल वारसा जपण्यासाठी फारसे परिश्रम शासकीय यंत्रणांकडून घेतले जात नाही. त्यामुळे वेरूळ येथील मूर्र्तींची पडझड होत आहे. - महेंद्र ठोंबरे, उपाध्यक्ष, टुरिस्ट गाईड असोसिएशनऔरंगाबादेत येणाऱ्या पर्यटकांचा ओघवर्षपर्यटक संख्याविदेशी पर्यटक२००६-०७१७,९१, ४६९६९,१५९२००७-०८२२,९५,४५९७६,८१६२००८-०९२५,१५,३४१५९,६१५२००९-१०२९,९९,४५८८०,३७९२०१०-११३५,१९,६५६८६,७२५२०११-१२ ३९,३७,६४५९१,१४२२०१२-१३४४,०९,९७८९६,९४४२०१३-१४३९,५१,०५२७६,५१६२०१४-१५३९,८९,७४१७७,३८५२०१५-१६३८,५५,०७७५४,०००(आकडे जानेवारीपर्यंत)