मुंबईत उत्साह : सेलीब्रेशनची खास रंगतमुंबई : विरोधाभासांनी भरलेल्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे मुंबईकरांनी जल्लोषात स्वागत केले. मावळत्या सूर्याच्या किरणांबरोबरच अस्तंगत पावलेल्या वर्षाला गुडबाय करीत लाखो मुंबईकरांनी निरनिराळ््या पद्धतीने नववर्षाचे जल्लोषात स्वागत केले. मुंबईप्रमाणेच राज्यभरातही हा उत्साह होता. राज्यातील सगळ््याच प्रमुख शहरांमध्येही सेलीब्रेशनचा मूड दिसून आला. संपूर्ण देशही नववर्षाचे स्वागत करण्यात दंग झाला होता. जगाची बात तर अजून न्यारी होती. न्यूझीलंडपासून सुरू झालेले सेलीब्रेशन युरोप खंडापर्यंत टप्प्याटप्प्याने कसे साजरे होत गेले, हे माध्यमांमधून करोडो डोळ््यांनी घरोघरी अनुभवले. मुंबईतील न्यू ईअर सेलीब्रेशनची रंगत खास अशीच होती. पंचतारांकित हॉटेल्स, पब, डिस्कोथेक, विविध हॉटेल्समध्ये केलेली आकर्षक रोशणाई, खासगी पार्ट्यांची रेलचेल, वाद्यवृंदाच्या साक्षीने नटलेल्या मुंबापुरीने ‘मुंबैया’ शैलीत नववर्षाचे स्वागत केले. गेट वे आॅफ इंडिया, मरिन ड्राइव्ह, गिरगाव चौपाटी, हाजी अली, वरळी सी फेस, शिवाजी पार्क, बँडस्टँड, जुहू, वर्सोवा चौपाट्या भरून गेल्या होत्या. (प्रतिनिधी)फटाक्यांची आतषबाजीबाराच्या ठोक्याला अख्ख्या मुंबापुरीने नववर्ष स्वागताचा एकच जल्लोष केला. आकाशात रंगीबेरंगी, फटाक्यांच्या आतषबाजीने आकाश न्हाऊन निघाले. रात्रीचा झगमगाट सगळ्यांना मोहात पाडतो. मात्र नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबापुरी अधिकच नटली होती. शहरातले सर्व मॉल्स, हॉटेल्स, इमारतींवरही दिव्यांची आकर्षक आरास करण्यात आली होती. अभूतपूर्व जल्लोषातस्वागत२०१४ला निरोप देऊन मोठ्या उत्साहात २०१५ चे स्वागत जगभरात करण्यात आले. सिडनी हार्बर ब्रिजवर झालेल्या नेत्रदीपक रोशणाईने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
वेलकम २०१५ !
By admin | Published: January 01, 2015 3:40 AM