आशीष गावंडे/अकोलाआदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळांमध्ये प्रवेश देऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाने राज्यातील ८९ शाळांची निवड केली आहे. ह्यएसटीह्ण(अनुसूचित जमाती) प्रवर्गातील चिमुकल्या विद्यार्थ्यांसाठी इयत्ता पहिली ते पाचवीमध्ये यंदाच्या शालेय सत्रापासून प्रवेश प्रक्रिया राबवण्याचा आदेश शासनाने जारी केला आहे.अतिदुर्गम भागात राहणार्या आदिवासींना शिक्षण,आरोग्याच्या सुविधा मिळत नसल्याची परिस्थिती आजही कायम आहे. यावर उपाय म्हणून आदिवासी आश्रमशाळांच्या माध्यमातून आदिवासी मुलांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या. बहुतांश आश्रमशाळा मराठी माध्यमाच्या आहेत. तर बोटावर मोजता येणार्या शाळांमध्ये सेमी इंग्रजी माध्यम लागू आहे. विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण लक्षात घेता त्यांना इंग्रजी माध्यम उपलब्ध करून देण्यासाठी आदिवासी विकास विभागाने राज्यभरातील ८९ इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांची निवड केली. इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या ह्यएसटीह्ण प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यावर खलबते झाल्यानंतर शासनाचे निकष पूर्ण करणार्या ८९ शाळांमध्ये चालू शैक्षणिक सत्रापासून इयत्ता पहिली ते पाचवीमध्ये प्रवेश देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.संस्थांसोबत करारनामाइंग्रजी माध्यमाच्या शाळा, संस्थेसोबत आदिवासी विकास विभागाने करारनामा केला आहे. त्यामध्ये मुलांचे शिक्षण,आरोग्य, सुरक्षा, निवास, आहार व अन्य सुविधा आदी उपलब्ध करून देणे संस्थेला भाग राहील. प्रकल्प अधिकार्यांनी करारनामा केल्यानंतर वेळोवेळी शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.शाळांना दिले जाईल शुल्कनामांकित इंग्रजी शाळेत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याच्या बदल्यात वर्गवारीनुसार ५0 टक्के शुल्क शासनाकडून अदा केले जाणार आहे. उर्वरित ५0 टक्के शुल्क शैक्षणिक वर्षाच्या शेवटच्या सत्रात परीक्षेपूर्वी दिले जाईल.
आदिवासी मुलांसाठी ८९ शाळांमध्ये ‘वेलकम’
By admin | Published: July 06, 2016 1:17 AM