पुणे - राज्यातील प्रत्येक जिल्हा स्तरावर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पात केली आहे. या तरतुदींचे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाºया विद्यार्थ्यांनी जोरदार स्वागत केले असून त्याची लवकर अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.राज्यात लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करीत असताना राज्य शासनाकडून या वर्षी राज्यसेवेच्या केवळ ६९ जागांची जाहिरात काढण्यात आली. या पार्श्वभूमीवर स्पर्धा परीक्षांच्या जागांमध्ये वाढ करावी, यासह विविध मागण्यांसाठी विद्यार्थ्यांकडून राज्यभर मोर्चे काढण्यात आले. त्यांचा असंतोष कमी करण्यासाठी राज्य शासनाने जिल्हास्तरावर स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.राज्याचा चौथा अर्थसंकल्प सादर करीत असताना मुनगंटीवार यांनी विद्यार्थी आणि शिक्षण यासाठी अनेक तरतुदी केल्या आहेत. विद्यार्थ्यांना अल्पदरात स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन उपलब्ध व्हावे, यूपीएससी परीक्षेमध्ये मराठी तरुणांचा टक्का वाढावा आदींसाठी या मार्गदर्शन केंद्राची मोठी मदत होणार आहे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांचा लोंढा पुण्यासह मोठ्या शहरांमध्ये येऊन धडकतो आहे. इथे अनेक अडचणींचा सामना करून त्यांना अभ्यास करावा लागतो. या पार्श्वभूमीवर त्यांना त्यांच्या जिल्ह्यामध्येच अभ्यास केंद्र उपलब्ध झाल्यास त्याचा मोठा फायदा होऊ शकेल.स्पर्धा परीक्षा केंद्रांच्या स्वरूपाची उत्सुकताशासनाकडून जिल्हास्तरावर उभारल्या जाणाºया स्पर्धा परीक्षा केंद्राचे नेमके स्वरूप कसे असेल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. यशदामध्ये दिल्या जाणाºया स्पर्धा परीक्षा केंद्राच्या धर्तीवर कोचिंग, अभ्यासिक, सुसज्ज गं्रथालय, विद्यावेतन आदींनी परिपूर्ण असे केंद्र उभारले जावे, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.‘राज्य शासनाकडे आम्ही ८ महिन्यांपूर्वी जिल्हास्तरावर स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्याची मागणी केली होती. त्याला शासनाने सकारात्मक प्रतिसाद देत त्याबाबतचा निर्णय घेतल्याने आम्ही त्याचे स्वागत करतो. अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विद्यार्थी अनेक अडचणींचा सामना करीत स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात. जिल्हास्तरावर हे केंद्र सुरू झाल्यानंतर त्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.’’- महेश बढे, विद्यार्थी‘शासनाने अत्यंत चांगला निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा गरीब विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकेल. प्रतिकूल परिस्थितीमध्ये अभ्यास करणाºया विद्यार्थ्यांना यामुळे मोठी मदत मिळेल.- कैलास शिंदे, विद्यार्थी
स्पर्धा परीक्षा केंद्रांचे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 4:57 AM