शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
2
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
3
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
4
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
5
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
6
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
7
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
8
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
9
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
10
Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स
11
"मशालसोबत विशाल अन् हातात घड्याळ"; विशाल पाटील-जयंत पाटील यांच्यात जुगलबंदी!
12
'ते' विधान धनगर समाजाचं अपमान करणारं; सुनील शेळकेंविरोधात बापू भेगडे आक्रमक
13
अर्जुन कपूर या गंभीर आजाराशी करतोय सामना, म्हणाला- "शरीराचं होतंय नुकसान"
14
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
15
सलमान खान अन् लॉरेन्स बिश्नोईवर गाणं लिहिणाऱ्यालाही आली धमकी, म्हणाले, "हिंमत असेल तर..."
16
शरद पवार गटाची फाइट अजित पवार अन् भाजपशी, अनेक मतदारसंघांत थेट सामना; तर काही ठिकाणी पाठिंबा
17
आदित्य, अमित ठाकरे यांच्यामुळे चुरस आणखी वाढली; कोणाचे पारडे राहणार जड? चार मतदारसंघांत मनसेचे महायुती, मविआला आव्हान
18
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका; पुन्हा MCLR मध्ये वाढ, होमलोनचा EMI वाढणार
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: यंदाच्या निवडणुकीत राज्यातील ३५ मतदारसंघात अल्पसंख्याक मतदार ठरणार निर्णायक

मलालाचे भारतात स्वागतच करु - शिवसेना

By admin | Published: October 21, 2015 1:06 PM

नोबेल पुरस्कार विजेती युसूफजाई मलालाने दहशतवादाविरोधात लढा दिला असून ती भारतात आल्यास शिवसेना तिचे स्वागतच करेल असे स्पष्टीकरण शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिले आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २१ - नोबेल पुरस्कार विजेती युसूफजाई मलालाने दहशतवादाविरोधात लढा दिला असून ती भारतात आल्यास शिवसेना तिचे स्वागतच करेल असे स्पष्टीकरण शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिले आहे. शिवसेनेला शत्रू समजणा-या मंडळींनी आधी पाकिस्तानमध्ये काय सुरु आहे हे बघावे आणि मग आमच्यावर टीका करावी असेही त्यांनी विरोधकांना सुनावले आहे. 

गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेने पाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून पाकिस्तानी गायक गुलाम अली, माजी परराष्ट्र मंत्री खुर्शिद कसुरी आणि भारत - पाकिस्तान क्रिकेट मालिकेला शिवसेनेने कडाडून  विरोध दर्शवला आहे. शिवसेनेच्या या आंदोलनावर सर्वत्र टीका होत असून नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसूफजाई ही भारतात आली तर शिवसेना विरोध दर्शवणार का असा सवालही उपस्थित होत होता. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे. 

मलाला युसूफजाई या लहान मुलीने दहशतवादाविरोधात लढा दिला व यासाठी तिने दहशतवाद्यांच्या गोळ्याही झेलल्या आहेत. अजूनही मलालाचा संघर्ष सुरुच आहे.शिवसेनेने मलालाचे नेहमीच कौतुक केले असून ती भारतात आल्यास तिचे स्वागतच करु असे त्यांनी सांगितले. दहशतवादाविरोधात लढणा-या शिवसेनेवर पाकिस्तानमध्ये बंदीची मागणी केली जाते आणि जमात उद दावासारख्या संघटनेला मोकळीक दिली जाते, यातून आता भारतानेच धडा घ्यावा असेही त्यांनी म्हटले आहे.