शहरं
Join us  
Trending Stories
1
रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक, मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात ICU मध्ये दाखल; सूत्रांची माहिती
2
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
3
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
4
लेबनॉनची अवस्था गाझासारखी करू; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा थेट इशारा
5
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
6
Smriti Mandhana ची शानदार फिफ्टी; ५०० धावांचा पल्लाही गाठला, पण...
7
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
8
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला
9
अजब गजब फिल्डिंग! Live मॅचमध्ये लाबूशेनने 'असा' उभा केला फिल्डर, अंपायरही चक्रावला (Video)
10
सूरतमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, गुंडांना पाहून मित्र पळाला
11
अमेरिकेसारखी सिस्टम बिहारमध्ये प्रशांत किशोर राबवणार; असं पहिल्यांदाच निवडणुकीत होणार! 
12
‘सुंदर तरुणींनी इथेच थांबा, बाकीच्यांनी…’’, HODवर विद्यार्थिनींनी केला गंभीर आरोप 
13
राहुल गांधींच्या पत्त्यावर ऑनलाइन जलेबी ...; काँग्रेसच्या जखमेवर भाजपनं चोळलं मीठ!
14
BREAKING: घाटकोपरच्या नारायण नगरमध्ये भीषण आग, नागरिकांची धावपळ; दाट लोकवस्तीमुळे परिसरात घबराट
15
"पवार साहेब म्हणाले, सगळीकडे आयात उमेदवार नाही", तिकीट वाटपाबद्दल रोहित पवारांचं विधान
16
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सील, PWD ने लावले कुलूप; कारण काय? पाहा...
17
शरद पवारांची चालाख खेळी: हजारो इच्छुकांच्या मुलाखती, पण बारामतीतील पत्ता राखून ठेवला!
18
अपक्ष उमेदवार सावित्री जिंदाल यांचा भाजप सरकारला पाठिंबा; मंत्रीपदाबाबत नवीन जिंदाल म्हणाले...
19
सुप्रिया सुळे यांच्या कारमध्ये नेत्याने फाईलने लपवला चेहरा; अजित पवारांनी रोखठोक शब्दांत दिली प्रतिक्रिया 
20
"काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीतील इतर पक्षांसाठी ओझं झालाय"; ज्योतिरादित्य शिंदेंचा खोचक टोला

शहरीकरणाचे सुनियोजित व्यवस्थापन आवश्यक

By admin | Published: September 12, 2016 4:28 AM

स्वातंत्र्यानंतर ग्रामीण भागाला डोळयासमोर ठेवून धोरणे तयार करण्यात आलीत. गावांचे रूपांतर शहरात होत गेले व अनेक नागरी समस्यांनी मोठे स्वरूप घेण्यास सुरुवात केली

नागपूर : स्वातंत्र्यानंतर ग्रामीण भागाला डोळ््यासमोर ठेवून धोरणे तयार करण्यात आलीत. गावांचे रूपांतर शहरात होत गेले व अनेक नागरी समस्यांनी मोठे स्वरूप घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे आता भविष्याची गरज लक्षात घेता ग्रामीण भागासोबत शहरांच्या विकासालाही प्राधान्य देण्याची गरज असून शहरीकरणाचे सुनियोजित व्यवस्थापन आवश्यक आहे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. ‘लोकमत महाचर्चा एनएमसी-एनआयटी व्हीजन २०२० (नागपूरचा विकास : समस्या, अपेक्षा व नियोजन)’ या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते.रविवारी कामठी रोड येथील ‘ईडन ग्रीन्ज’ येथे आयोजित या महाचर्चेच्या उद्घाटनप्रसंगी राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ‘लोकमत’ वृत्तपत्रसमूहाच्या ‘एडिटोरिअल बोर्ड’चे चेअरमन विजय दर्डा, खा.अजय संचेती, खा.विकास महात्मे, आ.कृष्णा खोपडे, आ.सुधाकर देशमुख, आ.विकास कुंभारे, आ.सुधाकर कोहळे, आ.अनिल सोले, आ.प्रकाश गजभिये, आ.जोगेंद्र कवाडे, महापौर प्रवीण दटके, पोलीस आयुक्त के.वेंकटेशम्, नासुप्र सभापती दीपक म्हैसेकर, ‘ओसीडब्लू’चे मुख्य प्रवर्तक अरुण लखानी, पूनम रिसॉर्टचे व्यवस्थापकीय संचालक एन.कुमार उपस्थित होते. समारोप सोहळ्याला मुख्य अतिथी म्हणून केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. वृत्तपत्रे अनेकदा प्रश्न मांडतात; परंतु केवळ प्रश्न मांडून परिवर्तन होत नाही. त्यांची उत्तरे शोधावी लागतात. तेव्हाच लोकशाहीचा खरा विकास होतो. ‘लोकमत’ने या महाचर्चेच्या आयोजनातून सामाजिक बांधिलकीचा परिचय दिला आहे व हे स्वागतार्ह आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले. ते म्हणाले, शहरांमध्ये रोजगारानिमित्त येणाऱ्यांची संख्या वाढते आहे. परंतु त्या दृष्टीने आवश्यक नियोजन नसल्यामुळे झोपडपट्टी व अनधिकृत बांधकामांची समस्या निर्माण होते. त्यामुळे या दिशेने योग्य प्रयत्न करणे आवश्यक आहे. शहरांच्या विकासासाठी तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करावा लागेल, असे ते म्हणाले. आॅरेंज सिटी वॉटर (ओसीडब्ल्यू) च्या सहकार्याने ही ‘महाचर्चा’ आयोजित करण्यात आली. यावेळी खा.विकास महात्मे, प्रवीण दटके, अरुण लखानी यांनीदेखील मत मांडले. कार्यक्रमाचे संचालन सहायक संपादक गजानन जानभोर यांनी केले. (प्रतिनिधी)