शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

चक्क ... सीमकार्डमुळे लागला म्हैस चोरीचा छडा

By admin | Published: August 23, 2016 9:25 PM

संपत तातोबा यादव यांची ४० हजाराची म्हैस लंपास करणाऱ्या चोरट्याला जेरबंद करण्यात विटा पोलिसांना मंगळवारी यश आले. म्हैस चोरतेवेळी चोरट्याचे मोबाईल सीमकार्ड घटनास्थळी पडल्याने

ऑनलाइन लोकमत

विटा : कमळापूर (ता. खानापूर) येथील संपत तातोबा यादव यांची ४० हजाराची म्हैस लंपास करणाऱ्या चोरट्याला जेरबंद करण्यात विटा पोलिसांना मंगळवारी यश आले. म्हैस चोरतेवेळी चोरट्याचे मोबाईल सीमकार्ड घटनास्थळी पडल्याने, त्यावरून पोलिसांना त्याच्यापर्यंत पोहोचता आले. याप्रकरणी कडेगाव तालुक्यातील खेराडे-विटा हे मूळ गाव असलेल्या व सध्या पलूस तालुक्यातील खटाव गावात सासुरवाडीत राहणाऱ्या राहुल तुकाराम मदने (वय २६) या चोरट्यास अटक करण्यात आली.कमळापूर येथील संपत यादव यांचा वडाच्या मळ्याजवळ आळसंद रस्त्यावर जनावरांचा गोठा आहे. दि. १६ आॅगस्ट रोजी मध्यरात्री संशयित राहुल मदने खटाव (ता. पलूस) येथील छोटा टेम्पो (क्र. एमएच-१०-बीआर-१७९८) भाड्याने घेऊन कमळापुरात आला. त्याने गोठ्यातील म्हैस व रेडकू टेम्पोत घातले. त्यावेळी त्याच्या मोबाईलचे सीमकार्ड तेथे पडले. यातील म्हैस त्याने नांद्रे (ता. मिरज) येथील त्याच्या नातेवाईकास विकली.

म्हैस चोरीला गेल्याचा प्रकार म्हैशीचे मालक यादव यांच्या निदर्शनास आल्यानंतर, त्यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी आजूबाजूला शोध घेतला असता, टेम्पोच्या टायरच्या खुणा दिसल्या. त्यावेळी त्यांना तेथे मोबाईलचे सीमकार्डही सापडले. यादव यांनी विटा पोलिसांत फिर्याद देऊन सापडलेले सीमकार्ड पोलिसांना दिले.

पोलिस निरीक्षक मोहन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस फौजदार शिवाजी बोते, हवालदार अमोल पाटील, मनोज जाधव, अजय लांडगे यांनी या सीमकार्डच्या आधारे तपास करून मदने यास मंगळवारी अटक केली. त्याला विटा न्यायालयात हजर केले असता, दि. २५ पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला. आणखी तीन म्हैशी चोरल्याची कबुलीसंशयित राहुल मदने खटाव येथे सासुरवाडीत राहण्यास आहे. त्यामुळे तेथील लोक त्याला ह्यजावईह्ण म्हणून ओळखतात. त्याला गजाआड केल्यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याने यापूर्वी कडेपूर येथील दोन व खेराडे-विटा येथील एक अशा तीन म्हैशी चोरल्याची कबुली दिली.