शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

विहिरींच्या चौकशीचे आदेश

By admin | Published: April 27, 2016 6:14 AM

सिंचन विहीर योजनेची वस्तुस्थिती मंगळवारी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच प्रशासकीय यंत्रणा खडबडून कामाला लागली.

लोकमत चमू,

 

औरंगाबाद- महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सिंचन विहीर योजनेची वस्तुस्थिती मंगळवारी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच प्रशासकीय यंत्रणा खडबडून कामाला लागली. मंत्रालयातून चौकशीचे आदेश धडकताच बीड, उस्मानाबाद, लातूर आणि परभणी जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे.गेल्या दीड वर्षात ४० हजार विहिरी पूर्ण केल्याचा दावा शासनाने केला होता. या अनुषंगाने ‘लोकमत’ने बीड, उस्मानाबाद, लातूर आणि परभणी या चार जिल्ह्यांत प्रातिनिधिक पाहणी केली असता वस्तुस्थिती वेगळीच असल्याचे समोर आले. अनेक ठिकाणी बोगस विहिरींना मंजुरी देण्याचे प्रकार समोर आले. लाभार्थ्यांनी कर्ज काढून विहिरींची कामे पूर्ण केलेली असताना त्यांना अनुदान मिळाले नाही. जिल्हाधिकाऱ्यांकडून खुलासा या प्रकरणी मंत्रालयातून विभागीय आयुक्तांकडे विचारणा करण्यात आली आहे. विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांनी परभणीचे जिल्हाधिकारी राहुल महिवाल व प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी कपाळे यांना खुलासा सादर करण्याचे आदेश दिले. तर दुसरीकडे, नागपूर येथील रोहयो विभागाच्या आयुक्तांनी मंगळवारी तातडीने जिल्हाधिकारी व जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र पाठवून खुलासा मागविला. परभणी जिल्हा परिषदेने या संदर्भात खुलासा पाठवून दिला असून त्यामध्ये पुन्हा आकडेमोड करण्यात आली आहे. तर एका दिवसात ६६ नवीन विहिरींना मंजुरी दिल्याचा प्रकारही समोर आला आहे.देयके थकल्याची कबुलीरोहयो विभागाने अकुशल ६ कोटी ६० लाख रुपये तर कुशल कामाचे ४ कोटी ५६ लाख रुपये देणे बाकी आहे. निधी उपलब्ध नसल्यामुळे ही देयके थकली असून आठ ते दहा दिवसात निधी उपलब्ध होताच तो संबंधित ग्रामपंचायतीकडे वर्ग केला जाईल, असेही खुलाशात म्हटले आहे. शिवाय, सेलू येथील १ हजार २६ सिंचन विहिरींना नियमबाह्य मंजुरी दिल्या प्रकरणी गटविकास अधिकारी एस.एन.गोपाळ यांना निलंबित केल्याचेही खुलाशात म्हटले आहे.४ हजार विहिरींच्या देयकांबाबत गोंधळ‘लोकमत’च्या पहाणीत पाथरी तालुक्यातील पोहेटाकळी येथील काही लाभार्थ्यांच्या कामावरील मजुरांची मजुरी पूर्णा तालुक्यात वळती झाल्याचे समोर आले होते. याबाबत पाथरी येथील सहाय्यक गटविकास अधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे खुलासा पाठविला आहे. त्यामध्ये लाभार्थ्यांच्या खात्याचे आयएफएससी कोड चुकल्यामुळे मजुरी देण्यास विलंब झाला. या संदर्भात अधिक माहिती घेतली असता जवळपास ४ हजार विहिरींच्या देयकासंदर्भात अशीच स्थिती असून केवळ कर्मचाऱ्यांच्या कामातील निष्काळजीपणा यास कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले आहे. बीडमध्ये आठ दिवसांत विहिरींची तपासणीबीड जिल्ह्यातील गत दोन वर्षातील मंजूर विहिरी आणि त्यांची नेमकी परिस्थिती शोधण्यासाठी वेगवेगळी पथके तयार करण्यात येणार असून आठ दिवसांत प्रत्येक विहीरींची तपासणी करण्यात येणार आहे. कागदावर विहिरी खोदण्याचा चमत्कार करणाऱ्यांवर कठोर कारवाईही करण्यात येईल, असा अहवाल मंगळवारी रोहयोचे उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब जाधव यांनी मंत्रालयाकडे पाठविला आहे.‘लोकमत’च्या वृत्तानंतर सकाळपासूनच जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेच्या कार्यालयातून आढावा घेण्याचे काम सुरू झाले. अनुदानाची रक्कम तातडीने अदा करण्यात येणार असल्याचेही जाधव यांनी सांगितले. नेमके वास्तव काय आहे, याचा शोध घेण्यासंदर्भात जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आदेश दिले आहेत. आता आम्ही जिल्ह्यातील प्रत्येक विहिरीची तपासणी करणार असून त्यासाठी पथक तयार करण्याचे आदेश तहसीलदार यांना देण्यात आले आहेत. गावकऱ्यांनी केला विरोधपाटोदा तालुक्यातील महासांगवीत साठ विहिरी कागदावरच खोदल्या असल्याचे वास्तव समोर आल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने या गावात सकाळीच नरेगाचे कृषी अधिकारी सी.वाय. पाटील, विस्तार अधिकारी बी.एस. शिंदे आणि इतर कर्मचाऱ्यांचे एक पथकच पाठविले. या पथकाने गावातील मंदिरात बसून शेतकऱ्यांकडून विहिरी पूर्ण झाला असल्याचे पत्र लिहून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु शेतकरी श्रीराम गर्जे आणि इतर शेतकऱ्यांनी याला विरोध केला. त्यामुळे कागदी घोडे नाचविण्यासाठी आलेले पथक आल्या पावलीच परत फिरले.उस्मानाबादेत ‘स्पॉट’पंचनामे उस्मानाबाद जिल्ह्यातील विहिरींचे ‘स्पॉट’वर जावून पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने मंगळवारी पंचायत समित्यांना दिले आहेत. पंचनामा करण्याची ही प्रक्रिया बुधवारी दिवसभर चालणार असून, रात्रीपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते यांना पत्र देवून सदर विहिरींची तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर सीईओ रायते यांनी पाचही पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांना पत्र काढून लोकमतने वृत्त प्रसिध्द केलेल्या विहिरींचे शेतकऱ्यांसमक्ष पंचनामे करण्याचे आदेश जारी केले. >दुष्काळामुळे दुर्लक्ष!जिल्हा परिषदेचे सीईओ नामदेव नन्नवरे यांनी लोकमतच्या वृत्ताची दखल घेत तातडीने जिल्ह्यातील प्रत्येक गटविकास अधिकारी यांना लेखी आदेश देऊन यासंर्भातील माहिती मागविली आहे. यासंदर्भात ते म्हणाले, प्रशासकीय कामात काही त्रुटी राहिल्या आहेत, हे खरे आहे. परंतु जिल्ह्यात चारा टंचाई आणि पाण्याची समस्या असल्याने या कामावर आम्ही अधिक लक्ष केंद्रीत केल्याने विहिरींच्या कामाकडे थोडेसे दुर्लक्ष झाले. पंधरा दिवसात मजुरांना पेमेंट देणे आवश्यक होते. परंतु काही ठिकाणी तांत्रिक अडचणी आल्याने ते दिलेले नाही. आता आपण स्वत: प्रत्येक पंचायत समितीत जावून बसणार आहोत आणि याचा आढावा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. >जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : सिंचन विहीरींच्या अनुदानाबाबत लातुरचे जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी विहीर निहाय चौकशीचे आदेश दिले़ लातूर जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजनेअंतर्गत १८१३ तर पाणीपुरवठ्यासाठी ५० विहीरींना मंजुरी दिली आहे़ यातील ३८२७ विहीरींचेच प्रत्यक्षात काम सुरु आहे़.   आॅनलाईनमुळे घोळरोजगार हमी योजनेतील कामांच्या मजूरीसह अनुदान आॅनलाईन पद्धतीने खात्यावर जमा करण्याची पद्धत आहे़ मागच्या काही काळात तांत्रिक अडचण आली होती़ त्यामुळे खात्यावर अनुदान किंवा मजुरी जमा झाली नसेल़ लातूर जिल्ह्यातील दहाही गटविकास अधिकाऱ्यांना सिंचन विहीरींच्या कामाबाबत तसेच मजुरी व अनुदानाबाबत चौकशी करण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती रोजगार हमी योजनेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ़संजय तुबाकले यांनी दिली़.