आई-बाबा मला माफ करा, असे पत्र लिहित अकोल्याच्या तरुणीने दिल्लीतीच राजेंद्र नगरमध्ये आपले आयुष्य संपविले आहे. दिल्लीला अंजली गोपनारायण ही तरुणी युपीएससीचा अभ्यास करण्यासाठी गेली होती. तीनवेळा अपयश आल्याने व खर्च वाढत चालल्याने नैराश्यातून अंजलीने हॉस्टेलमध्येच आत्महत्या केली आहे.
पीजी आणि हॉस्टेलवाले आम्हाला लुटत आहेत. विद्यार्थी हे सहन करू शकत नाहीत. अशा अनेक संकटांचा तिने तिच्या सुसाईड नोटमध्ये उल्लेख केला आहे. अंजली ही २५ वर्षांची होती, तिने २१ जुलैला आत्महत्या केली आहे. हे प्रकरण प्रसारमाध्यमांमध्ये आले नव्हते. आता त्याचा खुलासा झाला आहे.
युपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर प्रचंड दबाव आहे, हॉस्टेलवाले फक्त लुटत आहेत. अभ्यास करताना अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. आत्महत्या करणे हा काही त्यावरचा उपाय नाहीय, तरीही मी मृत्यूला कवटाळत आहे. सरकारी नोकऱ्यांमध्ये पारदर्शकता आणि नोकऱ्या निर्माण करण्याचे तिने या पत्रात लिहिले आहे.
अंजलीने पीजी आणि हॉस्टेलच्या मनमानी फीवाढीवर अंकुश लावण्यासही सांगितले आहे. हे लोक आम्हाला लुटत असतात. वाढलेल्या फीमुळे मला हे हॉस्टेल सोडावे लागत आहे. या पत्रात अंजलीने किरण आंटी आणि अंकलचा उल्लेख केला आहे. मृत्यूनंतर माझे अवयव दान करावेत, असे तिने आपल्या आई वडिलांना म्हटले आहे.
अंजलीचे वडील महाराष्ट्र पोलिस दलात सहाय्यक सब इन्स्पेक्टर आहेत. २३ जुलैला अकोल्याला तिचा मृतदेह आणण्यात आला. ५ ऑगस्टला तिला हॉस्टेल सोडायचे होते, त्यापूर्वीच तिने आत्महत्या केली आहे.