ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 6 - महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (एसएससी)परिक्षेचा ऑनलाईन निकाल सोमवारी जाहीर केला. या निकालानुसार पश्चिम व-हाडातील बुलडाणा जिल्ह्याने ८८.९१ टक्के मिळवून आघाडी घेतली आहे. तर अकोल्याचा निकाल या तिन्ही जिल्हयात सर्वाधिक कमी ८१.३४ टक्के निकाल लागला आहे. बारावीनंतर दहावीच्या परिक्षेतही यावर्षी ८५.२१ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून टक्केवारीत मुलींनीच बाजी मारली आहे.
अकोला जिल्हयात यावर्षी २८,८२८ विद्यार्थी परिक्षेला बसले होते. त्यापैकी २३ हजार ४५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.यामध्ये १४ हजार ७८८ पैकी ११ हजार ४८६ विद्यार्थी उर्त्तीण झाले आहेत. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी ७७.६७ टक्के आहे.तर १४ हजार ४० मुलींनी परीक्षा दिली. यातील ११ हजार ९६४ मुलीं उत्तीर्ण झाल्या असून, ही टक्केवारी ८५.२१ एवढी आहे.
याच जिल्हयातील ५ हजार ८९९ विद्यार्थी गुणवत्ता यादीत प्राविण्य प्राप्त केले आहे. ८ हजार ४५४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ७ हजार ४५४ विद्यार्थी व्दितीय श्रेणीत तर १ हजार ५६० विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
दरम्यान, बुलडाणा जिल्हा ८८.९१ टक्के मिळवून पश्चिम व-हाडात आघाडीवर असून, ८८.७२ टक्के प्राप्त करून वाशिम जिल्हा द्वितीय स्थानावर आहे. अकोला जिल्हा मात्र यावर्षी माघारला असून,या जिल्हयाची एसएससी परिक्षेतील निकालाची टक्केवारी केवळ ८१.३४ आहे.