West Bengal Election Result 2021: “भाजपने बंगाल निवडणूक प्रतिष्ठेची केली, पण जनतेने सत्तेपासून दूर ठेवलं”
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2021 03:56 PM2021-05-02T15:56:56+5:302021-05-02T15:58:21+5:30
West Bengal Election Result 2021: भाजपला सोडचिठ्ठी देत अलीकडेच राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनीही ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन करत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
मुंबई: देशभरात निवडणूक निकालाची धामधूम सुरू आहे. सर्वांचे लक्ष पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूक निकालाकडे (West Bengal Election Result 2021) लागले आहे. तृणमूल काँग्रेसचा विजय निश्चित झाला असून, यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. देशातील अनेक नेत्यांनी ममता बॅनर्जी यांचे केले आहे. भाजपला सोडचिठ्ठी देत अलीकडेच राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनीही ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन करत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. (west bengal election result 2021 ncp eknath khadse react on bengal election over bjp loss)
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन केले आहे. यानंतर एकनाथ खडसे यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. भाजपने निवडणूक प्रतिष्ठेची केली. मात्र, जनतेने भाजपला सत्तेपासून दूर ठेवले, असे खडसे यांनी म्हटले आहे.
कोरोनाने केलं पराभूत, मात्र मतदारांनी जिंकवलं; तृणमूलचा मयत उमेदवार आघाडीवर
भाजपला सत्तेपासून जनतेने दूर ठेवले
पश्चिम बंगालची निवडणूक भाजपने अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. पश्चिम बंगालच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा व भाजपाचे देशभरातील प्रमुख पदाधिकारी तिथे गेले होते. या ना त्या प्रकारे पश्चिम बंगालमध्ये आपली सत्ता स्थापन करावी, यासाठी भाजपा मैदानात उतरली होती. मात्र, पश्चिम बंगालच्या जनतेने पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. त्यांनी भाजपाला सत्तेपासून जनतेने दूर ठेवले आहे, असे एकनाथ खडसे म्हणाले.
बंगालमध्ये भाजपला धक्क्याचा परिणाम; आता ‘मिशन महाराष्ट्र’ बारगळणार? वाचा
दरम्यान, भाजप आणि तृणमूलमध्ये जोरदार टक्कर होईल असा अंदाज वर्तवण्यात येत होता. दोन दिवसांपूर्वी मतदान संपल्यानंतर आलेले एक्झिट पोल्सचे आकडे हेच दाखवत होते. पण प्रत्यक्षात मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी एकहाती लढत देत भाजपचे सत्ताबदलाचे मनसुबे धुळीस मिळवले. ममता बॅनर्जींचा तृणमूल पक्ष सध्या २०० पेक्षा अधिक मतदारसंघांत आघाडीवर असल्यानं सर्व एक्झिट पोल्स चुकले आहेत. एकाही एक्झिट पोल्सनं ममतांच्या पक्षाला २०० पेक्षा अधिक जागा मिळतील आणि भाजप १०० च्या खाली राहील असा अंदाज वर्तवलेला नव्हता.