ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 28 - पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. वांद्रे - माहीम स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. वाहतूक 15 ते 20 मिनिटं उशिरानं सुरु आहे. पॉईंट फेल्यूअर झाला असून बिघाड दुरुस्त करण्याचं काम सुरु आहे. सकाळच्या वेळीच वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. सकाळच्या वेळी कामाच्या निमित्ताने मुंबईच्या दिशेने येणा-यांची संख्या जास्त असते, त्यामुळे वाहतूक लवकर सुरळीत न झाल्यास स्थानकांवरील गर्दी वाढण्याची शक्यता असते.