शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
4
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
5
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
7
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
8
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
9
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
10
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
12
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
13
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
15
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
16
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
17
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
18
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
19
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
20
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर

महिला कैद्यांच्या मुलांचे काय ?

By admin | Published: January 30, 2016 1:27 AM

आईवडिलांना अटक केल्यानंतर किंवा कारागृहात शिक्षा भोगत असल्याने अनाथ किंवा गायब झालेल्या मुलांबाबत धोरण आखण्याबाबत एनजीओने केलेल्या सूचनेची अंमलबजावणी

मुंबई : आईवडिलांना अटक केल्यानंतर किंवा कारागृहात शिक्षा भोगत असल्याने अनाथ किंवा गायब झालेल्या मुलांबाबत धोरण आखण्याबाबत एनजीओने केलेल्या सूचनेची अंमलबजावणी करणार का, अशी विचारणा करीत उच्च न्यायालयाने दोन आठवड्यांत माहिती देण्याचे आदेश राज्य सरकारला दिले.शिक्षा भोगत असलेल्या आईबरोबर राहणाऱ्या किती मुलांना त्यांच्या आईशिवाय कारागृहाबाहेर पाठवण्यात आले आहे, असा प्रश्न तुरुंग महासंचालकांना करीत न्या. व्ही. एम. कानडे व न्या. रेवती मोहिते- ढेरे यांच्या खंडपीठाने दोन आठवड्यांत अशा मुलांची माहिती सादर करण्याचे निर्देश दिले.कारागृह मॅन्युअलनुसार अटकेत किंवा कैदेत असलेल्या महिलेबरोबर तिचे नवजात बालकच राहू शकते. मात्र या व्यवस्थेवर उच्च न्यायालयाने प्रश्नचिन्ह निर्माण केले. आईबरोबर कारागृहात राहणाऱ्या मुलांना ठरावीक वयानंतर कारागृहाबाहेर पाठवले जाते. अशा मुलांचे काय होते? ज्या मुलांना वडील नाहीत किंवा कुटुंब नाही, अशी मुले आईशिवाय कारागृहाबाहेर पडल्यानंतर अनाथ होतात. अशाप्रकारे अनाथ झालेल्या मुलांच्या किती केसेस आहेत, अशी विचारणा खंडपीठाने सरकारकडे केली. (प्रतिनिधी)सुविधांबाबत माहिती द्यातुरुंगात असलेल्या कैद्यांचे विशेषत: महिला व मुलांच्या अधिकारांची तपासणी करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने देशातील २४ उच्च न्यायालयांना दिले. या निर्देशानंतर मुंबई उच्च न्यायालयाने ‘स्यु- मोटो’दाखल करून घेतली.या केसमध्ये प्रयास ही एनजीओ उच्च न्यायालयाला साहाय्य करीत आहे. कारागृहात असलेल्या महिला व मुलांसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करायला हव्यात, असे या एनजीओने न्यायालयाला सांगितले. याच एनजीओने कारागृहात असलेल्या महिलांच्या मुलांसाठी धोरण आखण्याची शिफारस राज्य सरकारला केली होती. या शिफारशीची अंमलबजावणी करणार की नाही, यावर येत्या दोन आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.