अहमदनगर : मुंबई ते अहमदाबाद या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेनचा महाराष्ट्राला काय फायदा? उलट राज्याच्या तिजोरीवर खर्चाचा बोजा पडणार आहे. मुख्यमंत्र्यांनी हा प्रकल्प स्वीकारायच्या आधी विचार करायला हवा होता, अशा शब्दांत राष्टÑवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली. पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, मोठा गाजावाजा करून मुंबई ते अहमदाबाद या बुलेटट्रेनच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. बुलेट ट्रेनला आमचा विरोध नाही; परंतु या ट्रेनचा मुंबईसह महाराष्ट्राला काहीच फायदा होणार नाही. सुमारे १ लाख कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पासाठी महाराष्ट्राच्या तिजोरीतून ३५ हजार कोटी जाणार आहेत.शिवसेना शेतकºयांसाठी रस्त्यावर उतरायचे म्हणतेय. त्याचे आम्ही स्वागत करतो; परंतु सत्तेत बसून रस्त्यावर उतरता येत नाही. त्यासाठी आधी सत्तेतून बाहेर पडा. मग आमच्यासारखे रस्त्यावर या, असे म्हणत पवार यांनी शिवसेनेलाही पट्ट्यात घेतले. राज्य सरकारने जाहीर केलेली शेतकºयांची कर्जमाफी म्हणजे लबाडा घरचं आवतन आहे, ते जेवल्याशिवाय खरं नाही. आता पाहू कधी जेवायला मिळतंय ते, असा टोमणा पवार यांनी लगावला.अहमदाबादपर्यंत या ट्रेनचे एकूण ११ स्टेशन आहेत. त्यातील केवळ चारच महाराष्ट्राच्या हद्दीत आहेत. त्यामुळे या प्रकल्पाचा सर्वाधिक लाभ गुजरातलाच होणार आहे.बुलेट ट्रेन करायचीच होती, तर ती मुंबई-दिल्ली अथवा चंद्रपूर-पुणे-मुंबई अशी केली असती, तर त्याचा राज्यालालाभ झाला असता, असे पवार म्हणाले.
बुलेट ट्रेनचा राज्याला काय फायदा?,तिजोरीवर विनाकारण बोजा - शरद पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 3:13 AM