ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 1 - निवडणुकीच्या रणधुमाळीत सातत्याने भाजपाला लक्ष्य करणारे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर लगेचच मोदी सरकारवर टीका केली. दरवर्षी अर्थसंकल्प सादर करण्याची काय गरज आहे ? मागच्यावर्षी अर्थसंकल्पात दिलेली आश्वासने पूर्ण केली का ? असे प्रश्न विचारुन त्यांनी आपल्याच सरकारवर टीका केली.
राज्यातील महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपा युती तुटली असली तरी, केंद्रात आणि राज्यात शिवसेना भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सहभागी आहे. नोटाबंदीमुळे जनतेला मोठया प्रमाणात त्रास सहन करावा लागला. नोटाबंदीमुळे सरकारकडे मोठया प्रमाणावर रक्कम जमा झाली असली तरी, कर्जबुडवे निसटले आणि सर्वसामान्यांच्या खिशात हात घातला गेला असे उद्धव म्हणाले.
What is the need to present the Budget every year? Were all announcements of last year's budget fulfilled?: Uddhav Thackeray,Shiv Sena pic.twitter.com/zsOhA8ARqG— ANI (@ANI_news) February 1, 2017