मुंबई :
कंगना राणौतनवाजुद्दिन सिद्दिकीआयेशा श्रॉफएकामागोमाग एक बॉलिवुड सेलिब्रिटींची नावे...ठाणे पोलिसांनी उघड केलेल्या सीडीआर प्रकरणात उघड होऊ लागली आणि सगळीकडे एकच खळबळ माजली. खरंतर डिटेक्टिव्ह रजनी पंडित यांच्या अटकेनंतरच सर्वांचं लक्ष सीडीआर प्रकरणाकडे गेलं होतं. पण सेलिब्रिटींची नावे आली या प्रकरणाला ग्लॅमरचा तडका मिळाला. चर्चा अधिकच वाढली. सध्या चर्चेत असलेल्या या प्रकरणातील सीडीआर नेमका आहे तरी काय ते समजवून घेऊया:
सीडीआर म्हणजे नेमके काय?
- सीडीआर म्हणजे कॉल रेकॉर्डिंग डिटेल्स
- सीडीआरमध्ये कॉलबद्दलची संपूर्ण माहिती असते
- कॉल कोणी, कोणाला केला ते कळते
- कॉल कोठून केला, कोणत्या ठिकाणी केला
- कॉलची नेमकी वेळ
- कॉल टोल-फ्री किंवा नॅशनल किंवा इंटरनॅशनल कॉल
- कॉलसाठी आकारलेले शुल्क
- सीडीआर ही गोपनीय माहिती असते
- दुसऱ्या व्यक्तीची अशी माहिती मिळवणे गुन्हा
- कायदेशीर मार्गाने पोलीस ती मिळवू शकतात
- ती मिळवण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे पत्र लागते
- टेलिकॉम कंपनी त्यानंतरच कॉल रेकॉर्ड डिटेल पुरवू शकते
- मात्र या कायदेशीर मार्गाला झुगारून घोटाळेबाज सीडीआर मिळवतात
- त्यासाठी काहीवेळी काही पोलीस अधिकारी साथ देतात, असा संशय आहे
- काहीवेळा टेलिकॉम कंपनीतील कर्मचारी फोडूनही सीडीआर मिळवले जातात
- काही हॅकरही गोपनीय माहिती फोडू शकतात