मुंबई : रायगड जिल्ह्यातील मुरूड येथे पुण्याहून सहलीला आलेल्या १४ विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. या घटनेची गांभीर्याने दखल घेत मंगळवारी उच्च न्यायालयाने राज्यातील समुद्रकिनारे सुरक्षित ठेवण्यासाठी व अशा दुर्घटना टाळण्यासाठी आत्तापर्यंत काय पावले उचलली? अशी विचारणा करत राज्य सरकारला यासंबंधी संपूर्ण माहिती बुधवारी सादर करण्याचे निर्देश दिले.राज्यातील समुद्रकिनारे सुरक्षित ठेवण्यासाठी व अशा अप्रिय घटना घडू नयेत, यासाठी उच्च न्यायालयाने २००६मध्ये राज्य सरकार व महापालिकांना काही निर्देश दिले आहेत. या निर्देशांची अंमलबजावणी करण्यात न आल्याने जनहित मंच या एनजीओने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली.या याचिकेवरील सुनावणी न्या. नरेश पाटील व न्या. अमजद सय्यद यांच्या खंडपीठापुढे होती. (प्रतिनिधी)
राज्यातील किनाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी काय केले?
By admin | Published: February 03, 2016 3:19 AM