शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
2
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
3
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
4
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
5
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
6
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
7
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
8
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
9
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
10
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
11
Badlapur Case Accused Akshay Shinde: बदलापूर शालेय मुलींवर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर
12
विशेष लष्करी रेल्वे गाडीखाली स्फोटके ठेवल्या प्रकरणी RPF ने एकाला घेतले ताब्यात
13
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
14
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
15
इस्रायलचे हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले, 100 ठार तर 400 जखमी
16
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
17
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
18
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
19
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
20
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय

लोकमत समितीच्या अहवालावर काय केले?

By admin | Published: January 12, 2016 2:01 AM

लोकमत कमिटीच्या अहवालात उपस्थित केलेल्या प्रश्नांवर आजपर्यंत कोणती कारवाई केली, समितीच्या शिफारशीवर काय केले, वृत्त मालिकेत ज्यांना दोषी धरण्यात आले होते

- अतुल कुलकर्णी,  मुंबईलोकमत कमिटीच्या अहवालात उपस्थित केलेल्या प्रश्नांवर आजपर्यंत कोणती कारवाई केली, समितीच्या शिफारशीवर काय केले, वृत्त मालिकेत ज्यांना दोषी धरण्यात आले होते त्यांच्याविरोधात कोणत्या कारवाया केल्या आणि किती खटले प्रलंबित आहेत, अशा अनेक प्रश्नांची विचारणा अन्न व औषधी प्रशासन विभागाचे मंत्री गिरीष बापट यांनी विभागाचे आयुक्त हर्षदीप कांबळे यांच्याकडे केली आहे.एफडीए मधील गैरव्यवहारावर प्रकाशझोत टाकणारी लोकमतने ‘‘आरोग्यम ‘धन’ संपदा’’ ही वृत्तमालिका प्रकाशित केली होती. त्यावर तत्कालिक मंत्री मनोहर नाईक यांनी तत्कालिन आयुक्त महेश झगडे, अ‍ॅड. उदय बोपशेट्टी आणि उपआयुक्त संजय काळे यांची समिती नेमली गेली. समितीने हजार पानांचा सविस्तर अहवाल देत लोकमतने उघडकीस आणलेल्या प्रकरणांची सीबीआय अथवा सीआयडी मार्फत चौकशी करणे अत्यंत गरजेचे आहे असा शेरा दिला होता. सरकारने तो अहवाल स्विकारला होता. त्यानंतर सरकार बदलले. नव्याने आलेल्या भाजपा सरकारने या अहवालानुसार कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले. मात्र बैठका घेत अत्यंत फुटकळ कारणे देऊन अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचे काम केले जाऊ लागले आहे. अनेक दोषी अधिकाऱ्यांना कठोर शिक्षेऐवजी सौम्य शिक्षा देण्याच्या शिफारशी मंत्रालय स्तरावर विभागाचेच अधिकारी करु लागले आहेत. हा प्रकार मंत्री बापट यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी दोन प्रकरणात सह्णा करण्यास नकार दिला तरीही अशा फाईली रेटून नेणे सुरु आहे. दरम्यान, विधानभवनात बापट यांनी यावर सविस्तर बैठक घेतली. बैठकीस आयुक्त हर्षदीप कांबळे, दक्षता विभाग प्रमुख पोलिस अधिकारी हरिष बैजल यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. लोकमतच्या अहवालात निदर्शनास आलेल्या विविध मुद्यांवर पुढे काय झाले असा सवालही बापट यांनी केला. लेन्टीन आयोगाच्या सूचना काय होत्या? त्यातल्या किती सूचनांची अंमलबजावणी बाकी आहे, त्याची कारणे कोणती? शासन स्तरावर किती अपील आणि न्यायालय स्तरावर किती खटले प्रलंबित आहेत? किती निकाली काढले? नवीन पदनिर्मितीचा प्रस्ताव काय आहे? त्याचा सविस्तर अहवाल कधी मिळेल? असे अनेक प्रश्न बापट यांनी विचारले. यावर लवकरच माहिती सादर करण्याचे आदेशही त्यांनी दिले असून बैजल यांना लोकमत कमिटीच्या अहवालाचा अभ्यास करुन कोणते निर्णय प्रलंबित आहेत याचा अहवाल सादर करा, असेही बापट यांनी बैठकीनंतर सांगितले.