जळगाव : शरद पवार मराठा आरक्षणाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले ते ठीक आहे, पण या पूर्वी अनेक वर्षे ते सत्तेत होते, सोनिया गांधी यांच्याकडे त्यांनी पाणी भरले, तेव्हा मराठा आरक्षणाचा प्रश्न का सुटला नाही, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाचोरा येथील सभेत केला. सुरेशदादा जैन यांना सडविण्याचा प्रयत्न झाला, परंतु शिवसेना त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे, असेही त्यांनी या वेळी सांगितले.गुरुवारी पाचोरा येथे विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन ठाकरे यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. व्यासपीठावर माजी मंत्री सुरेशदादा जैन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे आदी उपस्थित होते. ठाकरे पुढे म्हणाले, ‘हे सरकार निर्णय घेणारे आहे. आम्ही मांडलेले प्रस्ताव मंजूर झाले आहेत. जर सर्वसामान्यांवर अन्याय होत असेल, तर सेना सरकारला साथ देणार नाही. आम्ही सत्तेत सहभागी आहोत म्हणजे सरकारजमा झालो, असे समजू नका.’ (प्रतिनिधी)
सत्तेत असताना पवारांनी काय केले?
By admin | Published: October 14, 2016 3:08 AM