पाच वर्षांच्या सत्ताकाळात काय केलं ? अशोक चव्हाणांचा भाजपला खोचक सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 04:32 PM2020-02-25T16:32:57+5:302020-02-25T16:35:22+5:30
शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी भाजप आक्रमक झाले असून आज भाजपच्या वतीने राज्यभर आंदोलनं करण्यात आली. त्याला अशोक चव्हाण यांनी चोख प्रत्युत्तर दिले.
मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफीचा निर्णय घेतला असून कर्जमाफीची प्रक्रिया सुरू झाली आहे. शेतकऱ्यांना मदत करण्याचे काम सरकार करत आहे. तुम्ही आंदोलन करून कायदा सुवस्थेचा प्रश्न उपस्थित करत आहात, असं सांगत पाच वर्षांच्या सत्ताकाळात तुम्ही कायं केलं असा सवाल काँग्रेसनेतेअशोक चव्हाण यांनी भाजपला केला.
शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी भाजप आक्रमक झाले असून आज भाजपच्या वतीने राज्यभर आंदोलनं करण्यात आली. त्याला अशोक चव्हाण यांनी चोख प्रत्युत्तर दिले.
उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जाची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्यक्षात 15 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात प्रातिनिधी स्वरुपात रक्कम जमा झाली आहे. ही प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे भाजपला शेतकरी कर्जमाफीविषयी बोलण्याचा अधिकार नाही. ज्यांना पैसे मिळाले ते समाधानी आहेत. शेतकऱ्यांना मदत करण्याचे काम सरकार करत असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
दरम्यान राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणे चुकीचे आहे. चार महिन्यापूर्वी तुम्ही सरकारमध्ये होते. पाच वर्षांच्या काळात तुम्ही काय केलं असा प्रश्न चव्हाण यांनी उपस्थित केला. तसेच महाराष्ट्रातील जनतेला दिलासा देण्याचा सरकारचा प्रयत्न राहणार असल्याचे चव्हाणांनी नमूद केले.