शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत फूट? शेतकरी कामगार पक्षाने जाहीर केले ५ उमेदवार; जयंत पाटलांनी केली घोषणा
2
शिंदे समर्थक अपक्ष आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार, भाजपाला दिला होता पराभवाचा धक्का
3
महाराष्ट्रात मविआत तणाव, तिकडे झारखंडमध्ये इंडिया आघाडीत फूट, हा पक्ष पडला बाहेर, उमेदवारही केले जाहीर
4
न्यायाधीश अन् कोर्ट सगळंच खोटं; गुजरातमधील १०० एकर सरकारी जमीन बळकावली
5
सचिन वाझेला हायकोर्टाकडून जामीन मंजूर; पण तरीही तुरुंगातच राहणार, कारण...
6
मोठा निष्काळजीपणा! ड्रायव्हर झाला डॉक्टर; इमर्जन्सी वॉर्डमध्ये रुग्णांना दिली औषधं, इंजेक्शन
7
Google कर्मचाऱ्यांना मोफत भोजन का पुरवते? सीईओ सुंदर पिचाई यांनी सांगितलं नेमकं कारण
8
"महाविकास आघाडी फुटणार"; शिवसेना नेत्याचा मोठा दावा, म्हणाले, " २४ तासांत उद्धव ठाकरे..."
9
जुन्नरमध्ये पुन्हा मोठा ट्विस्ट: शेरकरांच्या एंट्रीला तुतारीच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध; उमेदवारीच्या स्पर्धेत २ निष्ठावंत आघाडीवर!
10
यमुना एक्सप्रेस वेवरून जात होती कार, पोलिसांना आला संशय, तपाणसी केली असता सापडला सोन्याचा खजिना
11
प्रियंका चोप्राने अन्नू कपूर यांना किस करण्यास दिलेला नकार; म्हणाले, "माझ्याकडे चांगला चेहरा नाही..."
12
"देवेंद्र फडणवीसांनी फार हुशारीने..."; पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप, मोदींनाही सवाल
13
"ही चूक हरयाणात झालीये, महाराष्ट्रातही होतेय", पृथ्वीराज चव्हाणांनी ठेवलं मुद्द्यावर बोट
14
"दिल्लीत गुन्हेगारी वाढतेय, लोकांच्या मनात भीती असते की..."; आप नेत्याचा भाजपावर निशाणा
15
"बंटेंगे तो कटेंगे", मुंबईत योगींचे फोटो असलेले बॅनर्स; काय म्हणाले मुख्तार अब्बास नकवी?
16
चीनच्या जीडीपी एवढे झाले गोल्डचे मार्केट कॅप, 5 वर्षात व्हॅल्यू डबल; चेक करा देशातील सोन्या-चांदीचा लेटेस्ट दर
17
डॅशिंग IAS अधिकारी! वयाच्या ५७व्या वर्षी प्रेमविवाह; आता मंदिरांवरील लाऊडस्पीकरवर 'सवाल'
18
धर्मासाठी सिनेइंडस्ट्रीला केला रामराम, ३ हिट सिनेमात केलं होतं काम, सध्या काय करतेय २४ वर्षीय अभिनेत्री?
19
भाजपातील गटबाजीला कंटाळले, राष्ट्रवादीत गेले, तिथेही दिला राजीनामा; आता ठाकरेंकडे चालले
20
अजित पवार गट विधानसभेच्या किती जागा लढवणार? अजितदादा म्हणाले... 

बोटाला शाई लावून काय साधणार?

By admin | Published: November 16, 2016 6:14 AM

रद्द झालेल्या ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी येणाऱ्यांच्या बोटाला, मतदानाच्या वेळी लावतात तशी, शाई लावण्याचा निर्णय सरकारने

अजित गोगटे / मुंबई रद्द झालेल्या ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी येणाऱ्यांच्या बोटाला, मतदानाच्या वेळी लावतात तशी, शाई लावण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हा निर्णय प्रामुख्याने तीन उद्देशांनी घेण्यात आला आहे. १) रोजंदारीवर लोकांना कामाला ठेवून प्रत्येकी ४,५०० रुपये याप्रमाणे मोठ्या प्रमाणावर नोटा बदलून घेण्याच्या काळा पैसेवाल्यांनी शोधलेली पळवाट बंद करणे. २) लोकांनी पुन्हा-पुन्हा बँकांमध्ये येऊन पैसे काढण्यास आळा घालणे आणि ३) बँकांच्या बाहेर लागणाऱ्या रांगा कमी करणे, परंतु या उपायाने ही उद्दिष्टे कशी काय साध्य होणार, हा प्रश्न असून, उलट याचा प्रामाणिकपणे व्यवहार करायला जाणाऱ्यांनाच जास्त त्रास होईल, असे दिसते.पहिली गोष्ट अशी की, पैसे बदलून घेण्यासाठी बँकेत खाते असलेच पाहिजे, असे बंधन नाही. विशेषत: देशभरातील दीड लाखांहून अधिक पोस्ट आॅफिसांबाहेर लागणाऱ्या रांगा, या बहुतांश बँकांमध्ये खाते नसलेल्या लोकांच्याच आहेत. अनेकांनी दिवसाला ३०० रुपये रोजंदार देऊन, पैसे बदलून घेण्यासाठी माणसे कामाला लावल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. ३०० रुपयांमध्ये चार हजार रुपये काळ््याचे पांढरे करून घेण्याचा हा रासरोस धंदा आहे. बोटाला शाई लावल्याने, या प्रकारास फारसा आळा बसेल, असे दिसत नाही. दिवसभर मोलमजुरी करून ३०० रुपये न मिळणारे लाखो बेरोजगार या देशात उपलब्ध आहेत. एकाच शहरातील १०-२० बँकांमध्ये रांगा लावण्यासाठी पाठविलेल्या भाडोत्री लोकांच्या बोटाला शई लागल्यावर त्यांच्याजागी, दुसऱ्या दिवशी पुन्हा रांग लावण्यासाठी नवे रोजंदार सहज मिळू शकतात.ज्यांचे बँकेत खाते आहे त्यांच्यादृष्टीने बोटाला शाई लावणे निरर्थक आहे. कारण अशा लोकांनी आधी पैसे बदलून घेतले असतील तर त्याची नोंद खात्यात लगेच दिसेल व त्यांचे पुन्हा पैसे बदलून घेणे, शाई न लावताही रोखता येऊ शकेल.लोकांनी पुन्हा पुन्हा पैसे काढण्यासाठी बँकेत येऊ नये यासाठी शाई लावणे हे जखमेवर मीठ चोळणे ठरेल. कारण मुळात खातेदारांना त्यांच्या खात्यात पुरेशी रक्कम असूनही बँकेतून किंवा एटीएमने हवे तेवढे पैसे काढू न देणे हेच मुळात अन्यायकारक आहे. त्यातून आठवड्याला मिळू शकणारे २४ हजार रुपये, गरज असो वा नसो, एकदाच घेऊन जा; पुन्हा पुन्हा येऊ नका, असे सांगणे हे गरजवंतांच्या अडचणींचा गैरफायदा घेणे आहे.बँकांच्या बाहेर लागणाऱ्या रांगा कमी करण्यावर बोटाला शाई लावणे हा नव्हे तर नव्या, पर्यायी नोटा मुबलक प्रमाणावर उपलब्ध करून देणे आणि मुख्य म्हणजे एटीएममधून त्या मिळतील याची व्यवस्था करणे हा त्यावर उपाय आहे. बँकवाल्यांनी ज्यांच्या बोटाला शाई आहे अशांना रांगांमधून बाहेर काढण्यास सुरुवात केली तर कदाचित त्याचा परिणाम लोकांचा संयमाचा बांध फुटण्यात होऊ शकेल.