पुणे : राज्यात कोरोनाग्रस्त रुग्ण वाढत असून, गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याच संदर्भात विरोधी पक्षनेते असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी लोकमत फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून वाचकांच्या विविध प्रश्नांना उत्तरं दिली आहेत. यावेळी त्यांच्या लोकमतचे समूह संपादक विजय बाविस्कर यांनी संवाद साधला. या संवादात कोरोनासह विविध मुद्द्यांवर फडणवीस यांनी दिलखुलासपणे उत्तरं दिली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या कामगिरीवर प्रश्न विचारला. त्यावर फडणवीस यांनीही त्याला उत्तरं दिले.
राज्यात कोरोनाग्रस्त रुग्ण वाढत असून, गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याच संदर्भात विरोधी पक्षनेते असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी लोकमत फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून वाचकांच्या विविध प्रश्नांना उत्तरं दिली आहेत. कोरोनाग्रस्तांच्या सरकारी आकडेवारीवर संशय नको. आकडेवारीवर शंका घेण्याचं कोणतंही कारण नाही, असंही देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे. कुठल्याही जिल्ह्यातील आकडेवारी गुप्त ठेवण्याचा तर प्रयत्न नाही ना, याकडे पाहावं लागेल. आकडेवारी लपवल्यास फार मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. ही आकडेवारी आपण योग्य समजू, पण सरकारनं कुठलीही आकडेवारी गुप्त तर ठेवली जात नाही आहे ना, याची खातरजमा करायला हवी, असंही फडणवीसांनी सांगितलं आहे.
यावेळी लोकमतच्या एका प्रेक्षकाने प्रश्न विचारला की, 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामाबद्दल त्यांना काय वाटते'. त्यावर उत्तर देताना फडणवीस यांची टीका करण्याचे टाळले. ते म्हणाले की, 'आत्ता त्यांच्या कामावर बोलण्याची वेळ नाही. ते कोरोनाबाबत जे काम करतात त्याला आमचे पूर्ण समर्थन आहे. ज्या काही कमतरता आहेत त्या आम्ही त्यांना पत्र पाठवून सांगत आहोत. त्याचा बाऊ करण्याची आवश्यकता वाटत नाही.काही अधिकच्या गोष्टी करायला हव्यात असे मलाही वाटते. आता हा पंचनामा करण्याची ही वेळ नाही. ही वेळ त्यांना मदत करण्याची आणि ती अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवायची गरज आहे'.