...त्याचा बाप सांगतोय अजून काय हवं?; अजित पवारांचा पार्थला भक्कम पाठिंबा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 06:23 PM2020-03-20T18:23:23+5:302020-03-20T18:31:41+5:30
देशावर, राज्यावर संकट येतं तेव्हा सामुदायिक मुकाबला करायचा असतो
पुणे: पार्थ पवार सिंगापूरला काय कुठेही गेलेले नाहीत. मागच्या ३ ते ४ महिन्यात कुठेही गेलेले नाहीत. त्याचा पासपोर्ट दाखवू का? त्याचा बाप सांगतोय अजून काय हवं? अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पार्थ पवार सिंगापूरला गेले होते या अफवेचा खरपूस समाचार घेतला.
पुण्यात वाढत्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या धर्तीवर पुण्यातील परिस्थितीचा आढावा अजित पवार यांनी घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. या पत्रकार परिषदेला विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील उपस्थित होते. अजित पवार म्हणाले, राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ५२ झाली आहेत. तर पुण्याचा आकडा देखील २१ वर पोहचलेला आहे. त्यामुळे कोरोनाच्याबाबत सरकार, आरोग्य विभाग , जिल्हा प्रशासन यांनी दिलेल्या सूचनांचे गांभीर्याने पालक करावे. कोणत्याही प्रकारचे राजकीय , सामाजिक, धार्मिक कार्यक्रम आयोजित करु नका.नियोजित कार्यक्रम पुढे ढकलावे.
मुख्यमंत्री सातत्याने मुख्यालयात थांबून काम करत आहेत. ते आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलत आहेत. केंद्राकडून निधी घेतलेला नाही.राज्य सरकारकडे आहे. काळजी करू नका. खासगी व्यावसायिक घरात बसूनही काम करू शकतात. ते कर्मचाऱ्यांची काळजी घेऊन काम करू शकतात.अजून त्याबाबत कोणताही निर्णय नाही. काही सोसायट्यांमध्ये परदेशातून आलेल्या लोकांना घेत नाहीत. तो बाधित नसेल तर त्यांना सोसायटीत येऊ द्यावे.
लोकांनी शक्यतो घरात थांबावे. देशावर, राज्यावर संकट येतं तेव्हा सामुदायिक मुकाबला करायचा असतो. हे आपलं कर्तव्य आहे.
पिंपरी चिंचवड, पुण्यात सर्व व्यवहार बंद आहेत. ज्यांनी सहकार्य केले त्यांचे आभार आहे. पहिला, दुसरा टप्पा झाला पण आता तिसरा सुरू होतोय. पुढचे टप्पे महत्वाचे आहेत. देशाचे पंतप्रधान यांनी जनता कर्फ्यु जाहीर केला आहे. आपणही त्याची अंमलबजावणी करायला हवी. लोकल, सार्वजनिक वाहतूक ही अत्यावश्यक सेवा पुरवणा?्यांसाठी आहे. मात्र तरीही गर्दी होत असेल तर बंद करावी लागेल. असा निर्णय फक्त मुंबईत नाही तर पुण्यातही होऊ शकतो. कंपनी मालकांनी कामगारांशी माणुसकीने वागावे. हातावर पोट असणा?्यांची परिस्थिती गंभीर होईल. त्यामुळे खासगी आस्थापना बंद कराव्यात. आज 25 टक्के स्टाफ आला तर उद्या दुसरा 25 टक्के स्टाफ यावा. सर्व रजिस्ट्रेशन बंद केली आहेत.