शहरं
Join us  
Trending Stories
1
Navya Haridas: प्रियंका गांधींविरोधात भाजपाचा उमेदवार ठरला! नव्या हरिदास कोण?
2
अखेर रणजीतसिंह मोहिते पाटलांचं ठरलं! आमदारकीचा राजीनामा; लवकरच पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
3
ठाकरेंना कोणत्या जागा हव्यात, ज्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा गाडा फसलाय?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोहोळ, पंढरपूर अन् माढ्याचं गणित चुकल्यास पवारांचं राजकारण बिघडणार
5
Jharkhand Election 2024: भाजपाची पहिली यादी आली! झारखंडमधील ६६ उमेदवारांच्या नावाची घोषणा
6
वडील बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर झिशान सिद्दिकींची संतप्त पोस्ट; शायरीतून रोख कुणाकडे?
7
भाजप नेतृत्वाच्या मनात नेमकं काय?; फडणवीस-अजितदादा बाहेर, अमित शाह-CM शिंदेंची बंद दाराआड चर्चा!
8
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला की नाही? फडणवीसांनी दिली महत्वाची माहिती
9
माढ्यात पवारांना धक्का बसणार? काँग्रेसच्या इच्छुक उमेदवाराने मराठा समाजाकडेच मागितली उमेदवारी
10
JMM-काँग्रेसमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोण किती जागांवर निवडणूक लढवणार? जाणून घ्या...
11
IND vs NZ : कसोटी जिंकण्याची गॅरंटी किती? रेकॉर्ड बघून म्हणाला; "टीम इंडिया है तो मुमकिन है"
12
'वादळवाट', 'आभाळमाया' मालिकांचे गीतकार मंगेश कुलकर्णी यांचं निधन
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "...तर महाराष्ट्रात पडसाद उमटतील", बाबासाहेब देशमुखांनी ठाकरेंची चिंता वाढवली!
14
महागड्या प्लॅनचे टेन्शन संपले, Jio चा 84 दिवसांचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन
15
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'सांगोला'मध्ये ठाकरेंविरोधात पुन्हा 'सांगली पॅटर्न'?
16
Ladki Bahin Yojana: मोठी बातमी! लाडक्या बहिणी दिवाळी बोनसपासून मुकणार? निवडणूक आयोगाने योजना रोखली
17
IND vs NZ : भारताने ५४ धावांत ७ गडी गमावले; सुवर्णसंधी हुकली, विजयासाठी न्यूझीलंडसमोर खूप सोपे आव्हान
18
महाविकास आघाडीला झटका! अखिलेश यादवांनी चार उमेदवार केले जाहीर
19
झारखंडमध्ये निवडणूक आयोगाची मोठी कारवाई; पोलीस महासंचालकांना हटविले
20
माढ्यात तुतारीबाबतचा संभ्रम कायम; चार इच्छुक शरद पवारांच्या भेटीला पोहोचल्यानंतर काय घडलं? 

भाजप नेतृत्वाच्या मनात नेमकं काय?; फडणवीस-अजितदादा बाहेर, अमित शाह-CM शिंदेंची बंद दाराआड चर्चा!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 6:26 PM

राज्यातील तिन्ही नेत्यांसोबत बैठक झाल्यानंतर अमित शाह यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत बंद दाराआड स्वतंत्र चर्चा केल्याचे समजते.

Maharashtra Vidhan Sabha Election ( Marathi News ) : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास २२ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार असून २९ ऑक्टोबर ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असणार आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी वेगवान हालचाली सुरू असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच दिल्लीत जाऊन भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केली. दिल्लीतील या बैठकीनंतर सदर नेत्यांमध्ये चंदीगड इथंही एक बैठक पार पडली. मात्र चंदीगडमध्ये अमित शाह यांची राज्यातील तिन्ही नेत्यांसोबत बैठक झाल्यानंतर शाह यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत बंद दाराआड स्वतंत्र चर्चा केल्याचे समजते.

विधानसभा निवडणुकीनंतर राज्याच्या मुख्यमंत्री नक्की कोणार होणार, याबाबत सर्वत्र उत्सुकता आहे. महायुती म्हणून ही निवडणूक आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढू, मात्र मुख्यमंत्री कोण होणार, याचा निर्णय निवडणुकीनंतर आमचे केंद्रीय नेतृत्व घेईल, अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मांडण्यात येत आहे. अशातच अमित शाह यांनी चंदीगड येथील बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत १५ ते २० मिनिटे स्वतंत्र चर्चा केल्याने त्यांना नेमकं काय आश्वासन दिलं, याबाबत राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लढवले जात आहेत. 

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमेबाबतही भाजपचं केंद्रीय नेतृत्व समाधानी असल्याची माहिती आहे. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या या प्रतिमेचा अधिकाधिक वापर महायुतीने करून घ्यावा, अशी भाजप नेतृत्वाची इच्छा असल्याचं बोललं जात आहे. याबाबत 'एबीपी माझा'ने वृत्त दिलं आहे.

भाजपची पहिली यादी दोन दिवसांत? भाजपमध्ये दोन डझन विद्यमान आमदारांची तिकिटे कापली जाण्याची शक्यता आहे. या मतदारसंघांमध्ये बंडखोरीचा फटका बसू नये, यासाठी पक्षाने रणनीती आखली आहे. ही रणनीती अंमलात आणण्याची जबाबदारी प्रत्येक मतदारसंघात वेगवेगळ्या व्यक्तींना देण्यात आली आहे. त्यातील बहुतेकांनी उमेदवार यादी जाहीर करण्याची घाई करू नका, असे मत दिले आहे. भाजपची पहिली यादी गुरुवारीच जाहीर केली जाणार होती, पण या सगळ्या पार्श्वभूमीवर आता ती अडली आहे. तरीही, आमची पहिली यादी दोन दिवसांत येईल, असा दावा भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने नुकताच केला आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Eknath Shindeएकनाथ शिंदेAmit Shahअमित शाहMahayutiमहायुती