महाराष्ट्र सरकारच्या अंतरिम अर्थसंकल्पात एवढा योजनांचा पाऊस पाडला की मुख्यमंत्र्यांना स्वतःलाच माहिती नाही ते पुढे कसे घेऊन जायचे ते. दोन अडीच वर्षापासून तुमच सरकार आहे. पण इलेक्शनच्या तीन महिने आधी ही योजना जाहीर केली. तुम्ही केलेले काम काय तुम्हाला लोक विसरले असतील असे वाटले का, लोक विसरलेले नाहीत, असा टोला खासदार वर्षा गायकवाड यांनी लगावला.
माझा प्रश्न आहे की लेक लाडकी योजनेचे काय झाले? आम्ही सुकन्या सुरू केली, त्याचे नाव बदलून लेक भाग्यश्री आणली. भाग्यश्रीला बदलून लेक लाडकी योजना आणली होती. याचे किती लाभार्थी झाले याची संख्या सरकारने मला उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी गायकवाड यांनी केली.
महिलांविषयी तुमचे काय धोरण आहे ते आम्हाला माहिती आहे. महिलेला मंत्री करायला तुमचे धोरण नव्हते. शिवसेना आणि भाजप ने एकही महिलेला मंत्री केलेले नाही. त्यामुळे तुमचे महिलांबद्दल धोरण काय आहे ते मला सांगायची आवश्यकता नाही. राज्यात गॅसचा दर बाराशे होता तेव्हा राजस्थानमध्ये पाचशे रुपये होता. दक्षिण भारतात आम्ही महिलांच्या बँक खात्यात दोन हजार रुपये टाकले. आम्ही बोललो होतो की एक लाख रुपये महिलांना मिळणार, या सर्व आमच्या योजना आहेत. तुम्ही स्वत:चे काय आणले असा सवाल वर्षा गायकवाड यांनी केला.
न्याय देणार तेव्हा आम्ही बोललो होतो की एक लाख रुपये महिलांना मिळणार हे सर्व आमच्या योजना आहे. तुम्ही स्वतः काय आणलं? 400 पार बोलणाऱ्यांना लोकांनी त्यांची जागा दाखवली. मोदी सरकार बोलणारे आता एनडीए सरकार बोलत फिरत आहेत. धारावीचे डेव्हलपमेंट करावे ही संकल्पना आम्हीच मांडली 2004 मध्ये. टेंडरची प्रक्रिया सुरू झाली. मात्र त्यानंतर टेंडरचे मॅन्युफिलेशन करण्यात आले. एका व्यक्तीच्या फायद्यासाठी डीसी रूल बदलण्यात आले.
मुंबईतील अनेक जमिनी हडपण्याचा डाव सुरू आहे. आमची मागणी आहे की धारावीकरांना धारावीतच घर मिळावे. मग हे सर्वे, जमीन तुम्हाला कशाला हवी आहे. मुंबईतील अनेक प्राईम स्पॉटच्या जमिनी त्यांच्या मित्रांना देण्याचा काम सुरू आहे का? जो जमीन सरकार की वो अदानी की असे सध्या मुंबईत सुरु असल्याचे सांगत दिल्लीत याप्रकरणी आवाज उठविणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.