शहरं
Join us  
Trending Stories
1
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
2
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
3
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
4
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
5
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
6
अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
8
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
9
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
10
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
11
Stock Market Boom : राज्यातील महायुतीच्या 'महा'विजयानं शेअर बाजारात जल्लोष, Sensex-Nifty मध्ये तेजी; Adani चे शेअर्स वधारले
12
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी
14
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
15
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
16
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
17
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
18
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र
19
मॅपवर दाखविला अर्धवट पूल असलेला रस्ता; कार काेसळली २५ फूट खाली नदीपात्रात, ३ ठार
20
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: मित्रांकडून लाभ होईल, मंगल कार्याची सुरूवात करू शकता!

राजकीय वॉररूममध्ये चालतेय तरी काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2019 6:11 AM

लढाई मैदानात, माध्यमात अन् सोशल मीडियातही

- यदु जोशी ।लोकमत न्यूज नेटवर्क

डिजिटल रिव्होल्युशननंतर जगभरातील निवडणुकांचे तंत्रच बदलून गेले. यापूर्वी आमने-सामने होणाऱ्या राजकीय लढतीच्या मैदानी प्रचाराची जागा आता अभासी माध्यमाने (व्हर्च्युअल मीडिया) घेतली आहे. ज्याच्याकडे संगणक आणि मोबाइलच्या माध्यमातून मतदारांशी थेट संवाद साधण्याचे तंत्रकौशल्य आहे, तो या लढाईत बाजी मारुन जातात, असे जगभर दिसून येत आहे.

अलीकडच्या काळात अमेरिका, रशिया, फ्रान्स, जर्मनी आणि ब्रिटनमध्ये झालेल्या निवडणुकीत फेसबूक, टिष्ट्वटर आणि व्हॉट्स अ‍ॅप या सोशल मीडियाचा वारेमाप वापर करून मतदारांवर प्रभाव पाडल्याचे दिसून आले आहे. भारतातही २०१४च्या लोकसभा निवडणुकीत या तंत्राचा सर्वाधिक वापर भाजपने केला. स्वपक्षाचा प्रचार करण्याबरोबर विरोधकांबद्दल अपप्रचार करण्यासाठी पगारी कार्यकर्ते (ट्रोल आर्मी) नेमले गेले.

आजवर आबालवृद्धांच्या हातात स्मार्ट फोन आल्याने मैदानावरच्या लढाईपेक्षा ही सोशल मीडियावरच्या लढाईला महत्त्व आले आहे. २०१४चा अनुभव लक्षात घेत आता भाजपसह काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस, शिवसेना या प्रमुख पक्षांबरोबरच वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पक्ष अशा बहुसंख्य पक्षांनी सोशल मीडियावर प्रचारयंत्रणा उभी केली आहे.

भाजप, काँग्रेस, शिवसेना आणि राष्टÑवादी काँग्रेसने तर मुंबईत खास वॉररूम तयार केल्या असून, तेथून प्रचार आणि अपप्रचाराचे काम दिवसरात्र सुरू आहे. नेत्यांची भाषणं, पक्षाचा जाहीरनामा, ‘मैं भी चौकीदार’ आणि ‘चौकीदार चोर है’ सारखी घोषवाक्य जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न होत आहे. अशा वॉररूमचा घेतलेला हा आढावा.७५ हजार ग्रुपवर काही मिनिटांत निवडणुकीचे मुद्दे होतात व्हायरलमुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी प्रमुख नेत्यांचे भाषण झालं रे झालं की, काही क्षणातच त्यातील महत्त्वाचे मुद्दे भाजपच्या राज्यभरातील लहानमोठे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि प्रसिद्धी माध्यमांच्या वॉट्सअ‍ॅपवर पडतात. काँग्रेस-राष्ट्रवादीने केलेल्या टीकेचे उत्तर काही मिनिटांतच मीडियाला पोहोचते. भाजपच्या प्रदेश कार्यालयातील इलेक्शन वॉररूममुळे हे शक्य झाले आहे. शिवसेनेने तर युवासेनेच्या उत्साही कार्यकर्त्यांना सोशल नेटवर्किंग सोल्जर्सच बनविले आहे.भाजपच्या वॉररूमचे प्रमुख केशव उपाध्ये तर शिवसेनेच्या नेटवर्कचे सूत्रधार हर्षल प्रधान आहेत. प्रधान आणि युवा सेनेचे वरुण सरदेसाई, सूरज चव्हाण आदी दादरमधील सेनाभवनात बसून समन्वयाचे काम करतात. आम्ही वॉट्सअ‍ॅपवर टाकलेला एक मेसेज राज्यभरातील ७५ हजार ग्रुपवर काही मिनिटांत व्हायरल होतो. मेसेज पाठविण्याची तशी रचनाच आम्ही केली आहे. ती केवळ निवडणुकीपुरती नसून एरवीही सुरू असेल, असे प्रधान यांनी सांगितले. ते म्हणाले की, आम्ही भाडोत्री माणसं वापरत नाही. युवासेनेचे कार्यकर्तेच स्वेच्छेने काम करतात. ते टेक्नोसॅव्ही आहेत. फेसबुक लाइव्हपासून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या भाषणाच्या क्लिप्स व्हायरल काही क्षणात ते व्हायरल करतात. या दोघांचे भाषण सुरू असतानाच प्रसिद्धी माध्यमांना आम्ही पॉइंटर्स पाठवितो. हे सोल्जर्स केवळ निवडणुकीपुरतेच काम करत नाहीत. शिवसेनेच्या शाखा, तेथील पदाधिकाऱ्यांशी त्यांना कनेक्ट वर्षभर असतो. स्थानिक पातळीवरील समस्या त्या माध्यमातून उद्धवजींपर्यंत पोहोचतात. त्या सोडविण्यासाठी फॉलोअप घेतला जातो. अगदी वैयक्तिक अडचणींपासून राज्याशी संबंधित विषय त्यामुळे मातोश्रीवर पोहोचतात.

केशव उपाध्ये म्हणाले की, सकाळी ७ ते रात्री ११ पर्यंत आमची वॉररूम सुरू असते.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवेंसह पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या सभा आम्ही ट्रॅक करतो. जगभरातील माध्यमांपर्यंत त्यांची भाषणे काही मिनिटांत पोहोचविण्याची प्रभावी यंत्रणा आमच्याकडे आहे. सोशल मीडियाने माहितीचे जग बदलवून टाकलेय आणि त्याचा वेध घेत आम्ही काम करतोय. वेगवेगळे चॅनेल्स आणि वृत्तपत्रांच्या आॅनलाइन न्यूजवर पण आम्ही लक्ष ठेवतो. पक्षाची महत्त्वाची सूचना एका क्षणात राज्यभरातील पक्षजनांना पोहोचविण्याची व्यवस्था आम्ही करतो.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा