शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
2
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
3
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
4
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
5
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
6
'पंचायत'च्या मेकर्सने केली नव्या सिनेमाची घोषणा, सिद्धार्थ मल्होत्रा प्रमुख भूमिकेत! 'या' दिवशी होणार प्रदर्शित
7
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
8
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
9
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
10
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
11
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
12
Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स
13
"मशालसोबत विशाल अन् हातात घड्याळ"; विशाल पाटील-जयंत पाटील यांच्यात जुगलबंदी!
14
'ते' विधान धनगर समाजाचं अपमान करणारं; सुनील शेळकेंविरोधात बापू भेगडे आक्रमक
15
अर्जुन कपूर या गंभीर आजाराशी करतोय सामना, म्हणाला- "शरीराचं होतंय नुकसान"
16
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
17
सलमान खान अन् लॉरेन्स बिश्नोईवर गाणं लिहिणाऱ्यालाही आली धमकी, म्हणाले, "हिंमत असेल तर..."
18
शरद पवार गटाची फाइट अजित पवार अन् भाजपशी, अनेक मतदारसंघांत थेट सामना; तर काही ठिकाणी पाठिंबा
19
आदित्य, अमित ठाकरे यांच्यामुळे चुरस आणखी वाढली; कोणाचे पारडे राहणार जड? चार मतदारसंघांत मनसेचे महायुती, मविआला आव्हान

२०२४ काय, आताही राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करण्याची तयारी...; अजित पवारांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2023 8:10 PM

तीन राजकीय पक्ष एकत्रित येऊन महाविकास आघाडी येईल असं कुणालाही वाटले नव्हते. पण ते झाले असं अजित पवार यांनी सांगितले.

पुणे - राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपदाचं अजिबात आकर्षण नाही. २००४ मध्ये राष्ट्रवादीला मुख्यमंत्रिपद मिळाले असते तर आर. आर पाटील मुख्यमंत्री झाले असते. परंतु ती संधी मिळाली नाही. आता २०२४ ला काय, आताही राष्ट्रवादीचा मुख्यमंत्रिपद करण्याची तयारी असल्याचं मोठं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पुण्यात केले आहे. 

अजित पवार म्हणाले की, राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपदाचं अजिबात आकर्षण नाही. २००४ मध्ये राष्ट्रवादीला मुख्यमंत्रिपद मिळेल एवढी संख्या जनतेने दिली होती. परंतु राजकीय जीवनात काम करताना काही निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतले जातात आणि ते निर्णय पक्षाची शिस्त राहण्यासाठी ते सांगतील तसं ऐकावे लागते. त्यामुळे २००४ मध्ये राष्ट्रवादीच्या ७१ तर काँग्रेसच्या ६९ जागा आल्या होत्या. काँग्रेसची लोकांनी राष्ट्रवादीला मुख्यमंत्रिपद जाईल ही मानसिकता केली होती. पण दिल्लीत काय घडले माहिती नाही. राष्ट्रवादी काँग्रेसकडे उपमुख्यमंत्रिपद येणार, विधिमंडळाचा नेता म्हणून आम्ही बहुमताने आर.आर पाटलांची निवड केली होती. त्यातून कदाचित मुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीकडे आले असते तर २००४ मध्ये विधिमंडळ नेता म्हणून आर आर पाटील हे राष्ट्रवादीचे मुख्यमंत्री म्हणून झालेले पाहिले असते असं त्यांनी सांगितले. 

तसेच आम्हाला संधी मिळाली नाही, प्रयत्न करणे काम असते. मतदारांचा कौल मिळणे हे जनतेचे काम असते. त्यानंतर काळात नेहमीच आम्ही दोन नंबरला राहिला. त्यामुळे मुख्यमंत्रिपद काँग्रेसला आणि उपमुख्यमंत्रिपद आमच्याकडे आले. २०२४ ला काय, आताही राष्ट्रवादीची मुख्यमंत्रिपद मिळवण्याची तयारी आहे असं अजित पवारांनी स्पष्ट सांगितले. 

तो मान छगन भुजबळांचा होता१९९९ साली जेव्हा राष्ट्रवादीची स्थापना झाली. तेव्हा बहुसंख्य आमदारांचा कौल, चाचपणी केली जाते. अनेक दिग्गज उपमुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक होते. विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या बहुतांश आमदारांनी छगन भुजबळ यांची नेता म्हणून निवड केली होती. कारण राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर राज्यात शरद पवारानंतर राष्ट्रवादी जिल्ह्याजिल्ह्यात ढवळून काढण्याचं काम छगन भुजबळ यांनी केले होते. साहजिकच त्यांचा तिथे मान होता असं अजित पवारांनी म्हटलं. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अजित पवार बोलत होते. 

पृथ्वीराज चव्हाण अन् उद्धव ठाकरे दोघांनाही आमदारकीचा अनुभव नव्हतापृथ्वीराज चव्हाण आणि उद्धव ठाकरे या दोन्ही मुख्यमंत्र्यांसोबत काम करताना काय फरक जाणवला. त्यावर दोघांनाही आमदारकीचा अजिबात अनुभव नव्हता. पृथ्वीराज चव्हाण आणि मी १९९१ साली खासदार म्हणून दिल्लीत निवडून गेलो होतो. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण सातत्याने दिल्लीच्या वर्तुळात राहिले. केंद्र सरकारमध्ये पीएमओ कार्यकाळाचे मंत्री म्हणून त्यांनी काम केले. २०१० ला ते राज्याचे मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली. उद्धव ठाकरे यांनीही आमदार म्हणून काम केले नव्हते. तीन राजकीय पक्ष एकत्रित येऊन महाविकास आघाडी येईल असं कुणालाही वाटले नव्हते. पण ते झाले असं त्यांनी सांगितले. 

त्याचसोबत उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात आम्ही सगळ्यांनी आपलेपणाने काम केले. पृथ्वीराज चव्हाणांसोबत आम्ही ४ वर्ष काम केले. कधी कधी नाईलाजाने काम करावे लागते. कधी आनंदाने काम करावे लागते. उद्धव ठाकरेंच्या काळात आम्ही आनंदाने काम केले. पृथ्वीराज चव्हाणांच्या काळात वरिष्ठांच्या सांगण्यावरून नाईलाजाने काम केले असं स्पष्ट मत अजित पवारांनी व्यक्त केले. 

चुकतो तिथे मी वार करतो

देवेंद्र फडणवीसांबाबत मी मवाळ नाही. विधानसभेत जो चुकतो त्याच्यावर आम्ही वार करतो. आता शरद पवार आणि बाळासाहेब एकमेकांच्या घरी जेवायला जायचे. आम्ही पाहिलेय. परंतु जेव्हा सभा असायच्या तेव्हा एकमेकांवर कठोर टीका करायचे. कोणी कोणाची तुलना करू नये, यशवंतराव चव्हाण हे यशवंतराव चव्हाणच होते. ते पुन्हा होणार नाहीत. यामुळे शरद पवार आणि माझी तुलना होऊ शकत नाही असं अजित पवारांनी सांगितले. 

अजित पवारांनी शेवटचा सिनेमा कोणता पाहिला?मला पुण्यावरून ३ तास मुंबईला यायला वेळ होता. तेव्हा एकाने लॅपटॉपवर शाहरुख खान आणि दिपीका पादुकोणचा पठाण सिनेमा बघायला सांगितला. हा पूर्ण सिनेमा मी पाहिला आहे.  

मुख्यमंत्री व्हायला आवडेल?१०० टक्के आवडेल

उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे?उद्धव ठाकरे 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस