कारवाईची चिंता कसली, अजित पवार हेच राष्ट्रीय अध्यक्ष; मंत्री अनिल पाटलांची निकमांच्या उमेदवारीवरही प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2023 05:13 PM2023-09-25T17:13:41+5:302023-09-25T17:14:15+5:30

अजित पवार गटाच्या विधानसभेतील आमदारांचा अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांकडे कारवाई सुरु झाली आहे.

What is the concern of the action, Ajit Pawar is the National President of NCP; Minister Anil Patil's reaction on Ujjwal Nikam's candidature by BJP | कारवाईची चिंता कसली, अजित पवार हेच राष्ट्रीय अध्यक्ष; मंत्री अनिल पाटलांची निकमांच्या उमेदवारीवरही प्रतिक्रिया

कारवाईची चिंता कसली, अजित पवार हेच राष्ट्रीय अध्यक्ष; मंत्री अनिल पाटलांची निकमांच्या उमेदवारीवरही प्रतिक्रिया

googlenewsNext

महाराष्ट्रानंतर नागालँडमध्ये देखील शेड्युल 10 अंतर्गत आमदारांवर कारवाईची मागणी शरद पवार गटाने केली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार गटातील मंत्री अनिल पाटील यांनी अजित पवार हे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यामुळे कारवाईची चिंता करू नका, असे शरद पवार गटाच्या नेत्यांना सुनावले आहे. 

अजित पवार गटाच्या विधानसभेतील आमदारांचा अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांकडे कारवाई सुरु झाली आहे. दुसरीकडे शिंदे गटावरील अपात्रतेची कारवाई अंतिम टप्प्यात आहे. यातच अजित पवारांनी दोन दिवसांपूर्वी अर्थखाते किती काळ टिकू शकेल माहिती नाही असे वक्तव्य केले होते. यावरून सध्या राज्यात राजकीय अस्थिरतेच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. 

किती इंजिन हे मोजण्यापेक्षा हे युतीचं इंजिन आहे. आताच्या या युतीला इंजिनला तीन डबे आहेत. येणाऱ्या काळात आणखी डबे जोडले जाणार आहेत असे सांगत इतर पक्ष हे युतीत सहभागी होतील असा  दावा पाटील यांनी केला आहे. आणखी एक इंजिन जोडले जाणार होते, परंतू तीन इंजिनवर व्यवस्थित सुरू आहे म्हणून चौथे इंजिन फलाटावर उभे आहे, असे वक्तव्य उदय सामंत यांनी केले होते. यावर पाटलांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. 
रोहित पवार भावी मुख्यमंत्री बॅनरबाजीवर अशा पद्धतीने बॅनर लावून मुख्यमंत्री आणि मंत्री होत नाही. मंत्री किंवा मुख्यमंत्री व्हायचं असेल तर 148 चा आकडा गाठावा लागतो. बॅनर लावून मुख्यमंत्री होता येत नाही, असा टोला पाटील यांनी लगावला आहे.

उज्ज्वल निकम यांना लोकसभा उमेदवारी?
विशेष सरकारी वकील ॲड उज्वल निकम यांचे नाव भाजकपडून जळगाव लोकसभा मतदारसंघात जाहीर करण्यात आले आहे. यावर बोलताना पाटील म्हणाले की,  लोकसभेत उमेदवारी कोणी कोणाला द्यायची हा त्या त्या पक्षाचा प्रश्न आहे. उज्ज्वल निकम इच्छुक आहेत किंवा नाही हे मला माहीत नाही. सर्वेक्षण केल्यानंतर युती म्हणून सर्वांना चालणारा उमेदवार हा रावेर आणि जळगाव लोकसभा मतदार संघात असेल आणि युती म्हणून त्याच्याकडे बघितले जाणार आहे. 
 

Web Title: What is the concern of the action, Ajit Pawar is the National President of NCP; Minister Anil Patil's reaction on Ujjwal Nikam's candidature by BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.