महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपला आहे. अनेक धुरंधर त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात काय होईल, राज्यात काय होईल याचे अंदाज लावत आहेत. अशातच फलोदी सट्टाबाजाराचा अंदाज आला आहे. झारखंडमध्ये तसेच महाराष्ट्रात इंडिया आघाडी विरुद्ध महायुती(एनडीए) अशीच थेट लढाई झाली आहे. या निवडणुकीत कोणाचे सरकार येईल, यावर हा अंदाज आला आहे.
कोणता पक्ष जिंकेल याबाबत सट्टाबाजारात वातावरण गरम आहे. राजस्थानी सट्टाबाजाराचा अंदाज खरा ठरतो की खोटा हे जरी वादातीत असले तरी महाराष्ट्रात मविआवर जास्त पैसे आकारले जात आहेत. २८८ जागांपैकी महायुतीला १४४ ते १५२ जागा सट्टा बाजाराने दिल्या आहेत. तर भाजपाला ८७ ते ९० जागा दिल्या आहेत. महायुतीवर ४० पैशांचा दर तर मविआवर २ ते २.५० रुपयांचा दर लावला जात आहे. मविआ देखील चांगली टफ फाईट देत असल्याने जर स्विंग झालाच तर मविआ हॉट ठरणार आहे.
झारखंडमध्ये काय...झारखंडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा मुद्दा गाजला होता. फलोदी सट्टाबाजारानुसार भाजपा तिथे ५५ जागा जिंकत आहे. ८१ पैकी बहुमत असलेल्या ५०-५५ जागा भाजपाला जात आहेत. यावर २५ ते ३५ पैसे लावले जात आहेत. लोकसभेवेळी फलोदीने सट्टा बाजारचा भाव, अंदाज दिल्याने कारवाई करण्यात आली होती.
(डिस्क्लेमर: सट्टा बाजार बेकायदेशीर आहे. आम्ही सट्टा बाजाराच्या दाव्यांचे समर्थन करत नाही. हे अंदाज चुकीचे देखील असू शकतात.)