शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
3
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
4
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
5
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
6
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
7
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
8
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
9
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
10
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
11
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
12
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
13
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
14
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
15
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
16
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
17
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
18
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
19
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
20
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक

Ajit Pawar: ...ही काय पद्धत झाली का? शिंदे-फडणवीसांना हे पटतं का? त्या मुद्द्यावरून अजित पवार संतप्त 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 5:18 PM

Ajit Pawar Criticize Shinde Government: राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे. तसेच शिंदे गटाच्या आमदारांकडून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना देण्यात येत असलेल्या धमक्यांबाबत अजित पवार यांनी संताप व्यक्त  केला आहे.

मुंबई - राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे. तसेच शिंदे गटाच्या आमदारांकडून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना देण्यात येत असलेल्या धमक्यांबाबत अजित पवार यांनी संताप व्यक्त  केला आहे.  तसेच राजकारण करताना संस्कार कसे झाले पाहिजेत, हे शिकवणाऱ्या यशवंतराव चव्हाण यांनी घडवलेल्या महाराष्ट्रात तोडा, फोडा, मारा अशा भाषेत धमक्या दिल्या जात आहेत. ही बाब एकनाथ शिंदे यांना पटते का, देवेंद्र फडणवीसांना पटतं, भाजपाला पटतं का, अशी विचारणा अजित पवार यांनी केली आहे.

अजित पवार म्हणाले की, हे सरकार येऊन काही दिवस झाले आहेत. असं असाताना यांच्यातील काही आमदार हे महाराष्ट्रात संघर्ष पेटेल, अशी भाषा बोलताहेत. शिवसैनिकांना ठोकून काढा. हात तोडा, हात तोडता आले नाही तर तंगड्या तोडा, आरे ला कारे म्हणा, कोथळा काढा, अरे ही काय पद्धत झाली का. कुठे शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र, आपले पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, ज्यांनी आपल्याला सुसंस्कृतपणा शिकवला. ज्यांनी नेहमी काम करताना राजकारण करताना संस्कार कसे झाले पाहिजेत, हे शिकवणाऱ्या यशवंतराव चव्हाण यांनी घडवलेल्या महाराष्ट्रात तोडा, फोडा, मारा ही पद्धत, ही बाब एकनाथ शिंदे यांना पटते का, देवेंद्र फडणवीसांना पटतं, भाजपाला पटतं का, असा सवाल अजित पावर यांनी उपस्थित केलाय.

अजित पवार पुढे म्हणाले की, शिंदे गटाच्या एका बहाद्दर आमदाराने सरकराच्या कर्मचाऱ्याला मारलं. म्हणजे तुम्ही कायदा हाती घेऊ लागला आहात. सत्ता आली म्हणजे मस्ती आली आहे का तुम्हाला. शेवटी कुणीही व्यक्ती असली तरी तिला कायदा नियम सारखे आहेत. कायद्यापेक्षा संविधानापेक्षा कुणीही मोठा नाही. या पद्धतीची भाषा अजून सुरुवात झाली नाही, एवढी मस्ती कशी आली आहे. यांना दोन गोष्टी समवजावून सांगण्याचं काम संबंधितांचं नाही का. महाराष्ट्र हे उघड्या डोळ्यांनी बघतोय. १५ ऑगस्ट रोजी एक आमदार अशी भाषा करतोय, तीही मुंबईसारख्या ठिकाणी. मग चांद्यापासून बांद्यापर्यंत सामन्य माणसांची अवस्था काय होईल, असा सवाल अजित पवार यांनी विचारला आहे.   

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv Senaशिवसेना