ऑनलाइन लोकमत
सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पातून शेतक-याप्रमाणे शहरी जनतेलाही खूष करण्याचा प्रयत्न केला. शहरी भागात घर अनेकांचा जिव्हाळयाचा विषय असल्याने त्यांनी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 2 लाख 50 हजार घर शहरी भागात बांधणार असल्याची घोषणा केली.
शहरी भागातील दळवळणाला चालना देण्यासाठी नागपूर आणि मुंबई मेट्रोसाठी 700 कोटी तर, स्मार्ट सिटीतील शहरांसाठी 1600 कोटी रुपयांची तरतुद केली. पोलिसांच्या गृहनिर्माणासाठी 325 कोटींची तरतुद केली आहे.
- पायाभूत सुविधांच्या विकासासाठी महाइन्फ्रा ही संस्था स्थापन केली जाणार.
- मुंबई मेट्रो, नागपूर मेट्रो प्रकल्पासाठी 700 कोटींची तरतूद.
- स्मार्ट सिटी योजनेसाठी 1600 कोटी रुपयांची तरतूद.
- पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 2 लाख 50 हजार घरं शहरी भागात बांधणार.
- मुंबई विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागासाठी 25 कोटींची तरतुद.
- युवकांसाठी प्रमोद महाजन कौशल्य केंद्र उभारणार.
- स्वतंत्र ओबीसी महामंडळासाठी 2 हजार 384 कोटींची तरतूद.
- महिला सक्षमीकरणासाठी 7 कोटी 94 लाखांचा निधी उपलब्ध केला जाईल.
- पुढील 3 वर्षात 50 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प.
-अंगणवाडी बालकांना पोषक आहारासाठी 310 कोटींची तरतूद.
- अल्पसंख्यांक उमेदावारांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासाठी 8 कोटींची तरतूद.
- शामराव पेजे कुणबी विकास महामंडळासाठी 200 कोटींची तरतूद.
- वनक्षेत्रात पर्यटन प्रोत्साहनासाठी 80 कोटींची तरतूद