कणकवली (जि. सिंधुदुर्ग) : काँग्रेस खासदार हुसेन दलवाई यांचा सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसशी काय संबंध? त्यांना बैठक बोलाविण्याचा अधिकार काय असा संतप्त सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी शुक्रवारी ओसरगाव (ता.कणकवली ) येथे केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शुक्रवारी काँग्रेस अंतर्गत दोन बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांनी ओसरगाव महिला भवन येथे तर दुसरी बैठक सावंतवाडी येथे खासदार हुसेन दलवाई यांनी प्रदेश काँग्रेसतर्फे बोलावली होती. काँग्रेस नेते नारायण राणे, आमदार नीतेश राणे यांच्यासह जिल्हाध्यक्ष सामंत आणि सर्व तालुकाध्यक्षांना सावंतवाडी बैठकीचे निमंत्रणही नव्हते बैठकीला नारायण राणे, आमदार नीतेश राणे उपस्थित होते.
‘हुसेन दलवार्इंचा जिल्हा काँग्रेसशी काय संबंध?’ नारायण राणेंचा सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2017 4:13 AM