पुणे : लॉकडाऊनचा सर्व व्यापाऱ्यांवर परिणाम झाला आहे.यामुळे मार्केटचं विकेंद्रीकरण करण्याचा विचार व्यापाऱ्यांचा आहे. तसेच पुण्याजवळच्या भागात व्यापार स्थलांतरित करण्याची व्यापाऱ्यांची मागणी असल्याचे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. तसेच मातोश्रीवर जाण्यात कमीपणा कसला असा प्रश्नही त्यांनी भाजपच्या टीकेवर उपस्थित केला आहे.
शरद पवार आज पुण्यामध्ये होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कामावर समाधानी असल्याचे स्पष्ट केले. पारनेरमध्ये नगरसेवक फोडल्याचा मुद्दा छोटा आहे. मातोश्रीवर जाण्यात कमीपणा कसला, कोरोनाच्या संकटाने तिजोरीवर आघात केला आहे, असे पवार यांनी स्पष्ट केले.
पुढील 100 वर्षांचा विचार करत राज्य सरकारने व्यापाऱ्यांसाठी पुण्याजवळ काही हजार एकर जागा उपलब्ध करुन द्यावी. तिथे उद्योग-व्यवसायाबरोबरच एक्झिबिशन सेंटर, गृहप्रकल्प उभारता येतील, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली असल्याचे पवार म्हणाले. पुण्याच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने व्यापाऱ्यांची मागणी महत्त्वाची असल्याचेही पवार म्हणाले.
चंद्रकांत पाटलांची टीकादरम्यान, प्रणव मुखर्जीं यांना राष्ट्रपती करायचे होते तेव्हा २००४ साली सोनिया गांधी यांनी सांगितल्यामुळे, शिवसेनेची मते मागायला शरद पवार मातोश्रीवर गेले होते. त्यानंतर थेट आत्ता व गेल्या आठवड्यात तर दोन-तीन वेळा पवार मातोश्रीवर गेले आहेत. हे काही बरोबर नसून या वयात त्यांचा मान ठेऊन, त्यांनाच भेटायला गेले पाहिजे होते. वारंवार पवार यांना मातोश्रीवर हेलपाटे मारायला लावण्याची वेळ आणणे योग्य नसल्याचे मत व्यक्त करीत, भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना लक्ष्य केले़ आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
CBSE चा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; नववी, बारावीचा अभ्यासक्रम कमी केला
चीनला भिडले, माघार घ्यायला भाग पाडले अन् मगच भारतीय जवान मागे आले!
एक दोन नाही! 11 अमेरिकी लढाऊ विमानांनी चोहोबाजुंनी घेरले; चिनी सैन्य पाहतच राहिले
वनप्लसचा सर्वात स्वस्त फोन भारतात कधी येणार? लाँचिंगची तारीख Amazon नेच केली लीक
मुंबई मेट्रोमध्ये नोकरीची मोठी सुवर्णसंधी; पगार 1.22 लाखापर्यंत