ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 12 - भगवानगडाच्या पायथ्याशी झालेली भाषणे असंस्कृतपणाची आणि बेजबाबदारपणाची होती. त्या गडावर भाषणास परवानगी नाकारण्याचा निर्णय वर्तमान राज्यकर्त्यांचा होता. आणि त्याच्याशी बारामतीचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष दुरान्वयानेही संबंध नाही. परंतु भाषणे करणाऱ्यांनी ही बाब लक्षात घेतली नाही. त्यामुळे अशा 'सुसंस्कृत' नेत्याविषयी काय भूमिका घ्यायची हे मुख्यमंत्र्यांनी ठरवावे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे.पक्षाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात पवार म्हणतात, अशा असंस्कृतपणाच्या पातळीवर आपल्याला उतरता येणार नसल्याने संयम व सहनशीलता बाळगून शांतता राखावी. भगवानगडावर भाषणास परवानगी नाकारण्याचा निर्णय सर्वस्वी राज्यकर्त्यांचा होता. भाषणे करणारी मंडळी मंत्रिमंडळात मंत्री आहेत. त्यामुळे ही सर्व त्यांची अंतर्गत बाब आहे. असे असतानाही एखाद्या मंत्र्याने एखाद्या भागाचे वाटोळे करीन असे म्हणणे बेजबाबदारपणाचेच नव्हे तर मंत्री म्हणून घेतलेल्या शपथेचा भंग करणारे आहे. कारण या शपथेत मंत्री म्हणून आपण द्वेष, क्रोध या भावना न बाळगता मंत्रिपदाचे काम करेन असा उल्लेख केलेला असतो.
अशा 'सुसंस्कृत' नेत्याविषयी मुख्यमंत्र्यांनी काय ते ठरवावे- शरद पवार
By admin | Published: October 12, 2016 11:24 PM