मुंबई : राज्यात अनलॉक ४ ची नियमावली जाहीर करण्यात आली आहे. राज्य सरकारने मिशन बिगेन अगेन अंतर्गत लॉकडाऊनमध्ये अनेक सवलती दिल्या आहेत, त्याची नियमावली आज जाहीर झाली आहे. यामध्ये राज्य सरकारने ई-पास रद्द केला आहे. त्यामुळे राज्यात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवासासाठी परवानगी लागणार नाही. तसेच, हॉटेल आणि लॉजही सुरु करण्यात येणार असून मेट्रो, सिनेमागृह आणि शाळा-कॉलेज अद्याप बंद राहणार आहेत. मुंबई आणि MMR मध्ये शासकीय कार्यालय 30 टक्के क्षमतेने सुरु राहणार आहेत, तर उर्वरित महाराष्ट्रात शासकीय कार्यालयात 50 टक्के कर्मचारी उपस्थित राहतील.
‘अनलॉक ४’मध्ये काय बंद राहणार?- शाळा, कॉलेज, शिक्षण संस्था आणि क्लासेस बंदच राहणार आहेत. ऑनलाईन, डिस्टन्स लर्निंग सुरु राहणार आहे. - सिनेमा ह़ॉल, स्विमिंग पूल, पार्क, थिएटर, बार, ऑडिटोरियम आदी स्थळे बंदच राहणार आहेत. - एमएचएने परवानगी दिल्याशिवाय आंतरराष्ट्रीय विमान प्रवास बंदी. - मेट्रो सेवा बंदच राहणार आहे. - सामाजिक, राजकीय, खेळ, मनोरंजन, सांस्कृतीक कार्यक्रम बंद राहणार आहेत. -50 पेक्षा जास्त लोकांना सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र येता येणार नाही.- अंत्यविधी यासाठीदेखील 20 पेक्षा जास्त लोक एकत्रित येऊ शकणार नाही.- मंदिर आणि जिमबद्दल अद्याप कोणतीही घोषणा नाही.
‘अनलॉक ४’मध्ये काय सुरु राहणार? - सामान्य दुकाने, दारुची दुकाने सुरु राहणार आहेत. - हॉटेल, लॉज 100 टक्के क्षमतेने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. - सरकारी कार्यालये त्यांना दिलेल्या क्षमतेनुसार सुरु ठेवायची आहेत.- खासगी कार्यालयांमध्ये 30 टक्के कर्मचारी उपस्थितीला परवानगी आहे, - आंतरजिल्हा प्रवासासाठी आता परवानगी देण्यात आली असून कोणत्याही ई पासची गरज लागणार नाही. - खासगी बस, मिनी बस आदींच्या वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. - टॅक्सी - 1+3 प्रवासी, रिक्षा - 1+2 प्रवासी, चारचाकी- 1+3 प्रवासी, दुचाकी- 1+1 हेल्मेट आणि मास्क परवानगी.