- यदु जोशीलोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : कडूलिंबाच्या झाडाला साखरेचं कितीही पाणी टाकलं तरी ते गोड होऊ शकत नाही. तद्ववतच सत्तेसाठीची पात्रता आणि विश्वास गमावून बसलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला मतदान करण्यात अर्थ नाही आणि सत्तेबाबत युतीशिवाय पर्याय नाही याची मतदारांना जाणीव असल्याने राज्यात पुन्हा एकदा महायुतीचीच सत्ता येईल, असा विश्वास राज्याचे वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.
सगळे भाजपवाले सध्या शरदपवार यांच्यावरच का तुटूनपडले आहेत?तुटून पडण्याचा प्रश्नच नाही. आमचा अजेंडा शरद पवारांवर टीका करण्याचा नाही. महाराष्ट्राच्या विकासाचा आहे पण, पवार हे रोजच्या रोज भ्रम निर्माण करणारे राजकारण करीत आहेत. तसे ते वषार्नुवर्षे करत आलेच. कधी जातीच्या नावाखाली तर कधी धर्माच्या नावाखाली संघ, भाजपला ठोकायचे आणि सत्ता मिळवायची हेच त्यांनी केले. त्यामुळे त्यांच्या भ्रामक प्रचाराला प्रत्युत्तर द्यावेच लागेल. पवारांच्या राजकारणाला उतरती कळा केव्हाच लागली आहे. विधानसभा निवडणूक निकालात त्यांचं भ्रमाचं राजकारण संपल्याशिवाय राहणार नाही.अनेक ठिकाणी भाजपचेबंडखोर उमेदवार उभे आहेत.या बंडखोरीचा फटकाभाजपला बसेल?भाजपमध्ये बंडखोरांना कधीही यश आले नाही हा आजवरचा अनुभव आहे. बलराज मधोक, येडियुरप्पा, उमा भारती, कल्याणसिंह अशा अनेकांनी बंड करून बघितले, पण त्यांच्या पाठीशी भाजपमधील कोणीही उभे राहिले नाही; ते एकटे पडले. एक तर ते संपले किंवात्यांना पुन्हा भाजपमध्ये परत यावे लागले. आज विधानसभेला उभे असलेल्या भाजपच्या बंडखोरांना पक्ष संघटना त्यांच्या दावणीला बांधली आहे असे वाटत असेल तर तो त्यांचा भ्रम आहे आणि निकालामध्ये तो तुटेलच.मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीमतदारांना विरोधी पक्षाचीभूमिका मागितली आहे.आपल्याला काय वाटतं?नेमकी कोणती भूमिका वठवायची हे याबाबत राज नेहमीच गोंधळात राहिले आहेत. नेता कामाने मोठा होत असतो; भाषणाने नाही हेदेखील त्यांना इतक्या वर्षात समजले नाही. स्वत:च्या पक्षाचे आमदार, नेते,नगरसेवक त्यांना टिकवता आले नाहीत. एका गोष्टीसाठी मी त्यांचं कौतुक करतो. मनसेसह कोणत्याही विरोधी पक्षाची सत्ता महाराष्ट्रात येऊ शकत नाही हे त्यांना वेळीच कळून चुकले आहे. त्यामुळेच ते दुधाची तहान ताकावर भागवत विरोधी पक्षाचा रोल मागत आहेत. त्यांना तो रोलदेखील मिळणार नाही.सुशीलकुमार शिंदे म्हणतातत्याप्रमाणे काँग्रेस-राष्ट्रवादीयांचे भविष्यात विलीनीकरणहोईल असं वाटतं का?विलीनीकरण झाले काय अन् नाही झाले काय त्याने आम्हाला काहीही फरक पडत नाही. एक अधिक एक बरोबर दोन होतात पण आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची अवस्था शून्यासारखी झाली आहे. त्यामुळे शून्य अधिक शून्य बरोबर शून्यच होणार. लोकांचा विश्वास संपादन करून सत्तेपर्यंत पोहोचण्याची क्षमता या दोन्ही पक्षांनी गमावली आहे. दोन्ही पक्ष आता थकले असल्याचे वास्तव स्वत: शिंदे यांनीच स्वीकारले आहे.वित्त मंत्री म्हणून आपण केलेलीठोस कामगिरी कोणती?राज्य महसूल तुटीतून महसुली अधिक्यापर्यंत नेण्यात यश आलं. गेल्या वर्षी २०८२ कोटींचे आधिक्य होते. यंदा ते अंदाजे १५ हजार कोटी रुपये असेल. अर्थसंकल्प हा केवळ सरकार आणि मंत्र्यांचा न राहता मी जनतेच्या सूचना मागवल्या आणि त्या अर्थसंकल्पात अंतर्भूत केल्या. त्यामुळे जनकल्याणाचा अर्थसंकल्प देऊ शकलो. आघाडी सरकारमधील २८.२ टक्क्यांचा ऋणभार १५ टक्क्यांपर्यंत खाली आणला.काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीचंआव्हान भाजपला मोठं वाटतं का?काँग्रेस नेतृत्वहीन झाली आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादीमध्ये नेतृत्वासाठी संघर्ष सुरू आहे. काका-पुतण्याची ही लिमिटेड पार्टी सध्या हा संघर्ष अनुभवत आहे. एकमेकांना शह-काटशह देणा?्या नेत्यांची राष्ट्रवादीत गर्दी आहे.अशावेळी या पक्षाचे नाव राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीऐवजी वादावादी पार्टी ठेवण्याची वेळ आली आहे. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, दोन नातू यांच्याशिवाय त्या पक्षात कोणीही महत्त्वाचे नाही.