शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
3
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
4
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
5
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
6
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
7
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
8
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
9
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
10
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
11
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
12
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
13
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
14
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
15
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
16
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
17
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
18
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
19
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

वाराणशीत ‘आप’का क्या होगा?

By admin | Published: May 11, 2014 12:37 AM

साधनसामुग्री नाही आणि महत्वाचे म्हणजे जाती धर्माच्या नावावर मिळणारा हक्काचा मतदार नाही. अशा वेळी केजरीवाल निवडून येतील तरी कसे ? हा प्रश्न आहे.

गजानन जानभोर - वाराणशी
परिश्रम, प्रामाणिक कार्यकर्त्यांची सोबत, सामान्यांतून सामान्य माणसापर्यंत पोहचण्याचे प्रयत्न, मतदारांच्या थेट हृदयात हात घालणारा संवाद एवढय़ा जमेच्या बाजू असुनही अरविंद केजरीवाल वाराणशीच्या रणांगणात बाजी मारतीलच, याची शाश्‍वती देता येत नाही.  कारण, फारसा निधी नाही, संघटित कार्यकर्त्यांची फळी नाही, साधनसामुग्री नाही आणि महत्वाचे म्हणजे जाती धर्माच्या नावावर मिळणारा हक्काचा मतदार नाही. अशा वेळी केजरीवाल निवडून येतील तरी कसे ? हा प्रश्न आहे. 
नरेंद्र मोदी यांनाच निवडून द्यायचे या निष्कर्षाप्रत वाराणशीची जनता येऊन पोहोचली आहे, असा दावा भाजपा करत आहे. सुरुवातीला मोदींपुढे अडथळ्यांचे अनेक घाट होते. पण हळुहळू ते पूर्ण करण्यात मोदींना यश आले. वाराणशीची हवा आता त्यांच्यासाठी अनुकूल झाली आहे, असे मोदी सर्मथकांचे म्हणणे आहे. अरविंद केजरीवाल यांनी नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वाराणशीच्या लढाईत उतरून ही निवडणूक देशभरात चर्चेला आणली. केजरीवाल मोदींच्या विरोधात येथून उभे राहिले नसते तर या निवडणुकीची एवढी चर्चाही झाली नसती ही वस्तुस्थिती आहे. 
नेत्यांच्या सभांना, रोड शो ला उसळणार्‍या गर्दीचे रुपांतर मतांमध्ये होत नाही. हा निवडणुकांमधील सार्वत्रिक अनुभव आहे. केजरीवालांच्या सभांना, रोड शो ला लोक गर्दी करतात. त्यात उत्सुकता असते, शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्याची भावनाही असते.  ‘यावेळी आपल्याला बदल हवा आहे, असे सार्‍यांना सांगणारा सामान्य माणूस आपली बांधिलकी सिद्ध करण्यासाठी, स्वत:च्या मनाला बजावून सांगण्यासाठी केजरीवालांच्या नुक्कड सभेला उपस्थिती लावतो, पांढरी टोपी घालून फिरण्यात त्याला कमालीचा आनंदही मिळतो. ‘मी प्रामाणिक आहे आणि चांगल्या माणसाच्या पाठीशी उभा आहे’ हे त्याला सुचवायचे असते. आपले अस्तित्व दाखवून देण्यासाठी पाच वर्षांतून एकदाच मिळणारी संधी तो सोडणार तरी कसा? पण मतदान करताना त्याची जात आणि धर्म आड येतो. आपले मत वाया तर जाणार नाही ना? असा नफ्या-तोट्याचा व्यवहार त्यात असतो. लाटेचा, अस्मितेचा, नातेसंबंधांचा त्याच्यावर एवढा दबाव असतो की, मतदान करताना तो व्यवहारच बघतो. केजरीवालांच्या बाबतीत वाराणशीत नेमके हेच होत आहे. 
या निवडणुकीत वाराणशीत ‘छतसभा’ हा एक आगळावेगळा प्रयोग पाहायला मिळाला. दाटीवाटीच्या मोहल्ल्यात नुक्कड सभाही घेता येत नाही. अशा ठिकाणी केजरीवालांच्या कार्यकर्त्यांनी घरावरच्या छतांवर सभा घेतल्या. हे काँग्रेस आणि भाजपवाल्यांनाही जमले नाही. वाराणशीच्या मुख्य रस्त्यांवर आणि चौकात हातात झाडू घेतलेले तरुण तासनतास उभे असल्याचे दिसतात. ते कुणाशी बोलत नाहीत. भाषणही देत नाहीत. ते फक्त शांत उभे असतात. रस्त्याने जाणार्‍या येणार्‍यांचे लक्ष गेले की, झाडूकडे लक्ष वेधून नमस्कार करतात. दरवेळी धार्मिक, जातीय अस्मितेभोवतीच गुरफटणार्‍या वाराणशीकरांना यावेळी प्रथमच त्यांच्या प्रश्नांची, समस्यांची जाणीव करून देण्यात आली. याचे श्रेय कुणाला आवडो न आवडो पण ते केजरीवालांनाच द्यावे लागेल. वाराणशीचे दुखणे, गार्‍हाणे प्रथमच या निमित्ताने सार्‍या जगासमोर आले. 
 
वाराणशीचा एक वेगळा स्वभाव आहे. ती आपला स्वभाव कधीच बदलत नाही. ‘परिवर्तन’ हवे पण ‘क्रांती’ नको, असे या स्वभावाचे वर्णन करता येईल. मोदींच्या रुपाने ते परिवर्तन होईल, पण केजरीवालांच्या रुपाने क्रांती करायला ही नगरी धजावणार नाही.
 
केजरीवाल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावेळी त्यांना मिळालेला पाठिंबा आणि शुक्रवारच्या रोड शोमध्ये उसळलेला जनसमुदाय बघितल्यानंतर केजरीवाल शंभर टक्के निवडून यायला हवेत. पण तसे होणार नाही. याचे कारण असे की, वाराणशीच्या मतदारांनी कौल कुणाला द्यायचा हे ठरवून टाकले आहे. प्रेम, सहानुभूती केजरीवालांबद्दल परंतु मत मोदींनाच असा हा वाराणशीकरांचा हिशेब आहे.