आज पहिल्यांदा संजय राऊत अर्धसत्य बोलले आहेत. पहिल्या पार्टमध्ये काही बंधने होती त्या बंधनांमुळे धर्मवीर आनंद दिघेंना संजय राऊत आणि मंडळी कसा त्रास द्यायची, कशा पद्धतीने ते दिघेंचा दुस्वास करायचे, कशा पद्धतीने दिघेंचे खच्चीकरण करायचे ते दाखविता आले नव्हते. यामुळे आजच्या वक्तव्यावर संजय राऊतांचे अभिनंदन करतो, असे शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी म्हटले आहे.
दिघे गेल्यानंतर एकच प्रश्न विचारला गेला की त्यांची प्रॉपर्टी कुठे कुठे आहे आणि हे यामध्ये समोर येणार आहे. पहिल्या पार्टमध्ये बंधने होती. संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीमुळे दिघेंना जो टाडा लागला तो केवळ राऊतांच्या लोकप्रभातील लेखामुळे लागला, ते लोकांसमोर येईल, असा गौप्यस्फोटही म्हस्के यांनी केला.
राऊत यांनी दिघेंचा दुस्वास केला. पहिल्या पार्टमध्ये मातोश्रीने केलेला, दाखविता आला नाही. ते दाखविण्याची राऊतांची इच्छा असावी. संजय राऊतांनी शिवसेना संपविण्याची शरद पवारांकडून सुपारी घेतलेली आहे. ते काम ते चोखपणे पार पाडत आहेत, अशी टीका म्हस्के यांनी केली.
दिघे साहेबांचे आत्मचरित्र लोकांसमोर आणने हा राजकीय स्वार्थ नाही तर सामाजिक स्वार्थ आहे. येणाऱ्या पिढीला दिघे कळावेत हा त्यामागचा उद्देश आहे, असेही म्हस्के म्हणाले. तसेच जे लोक आंदोलनामध्ये पकडले जातायत त्यात शरद पवार यांच्या कार्यकर्त्यांची व मंत्र्यांची माणसे सापडत आहेत. याबद्दल सुप्रिया सुळे यांनी प्रथम स्पष्टीकरण द्यावे, असेही म्हस्के म्हणाले.