शहरं
Join us  
Trending Stories
1
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

विदर्भ सघन सिंचन विकास कार्यक्रमाला घरघर

By admin | Published: September 19, 2016 2:36 AM

शेतकरी चिंतेत; १ लाख २७ हजार ५५0 शेतक-यांचे अनुदान प्रलंबित.

सिद्धार्थ आराख मेहकर (जि. बुलडाणा), दि. १८: विदर्भ सधन सिंचन विकास कार्यक्रमांतर्गत २0१२-१३ ते २0१६-१७ या कालावधीसाठी विदर्भात राबविण्यात आलेल्या सूक्ष्म सिंचनाचे सुमारे १ लाख २७ हजार ५५0 शेतकर्‍यांचे २५३ कोटी ४६ लाख ३१ हजार रुपयांचे अनुदान अद्यापही प्रलंबित आहे. यंदा विदर्भात पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत सूक्ष्म सिंचन योजना राबविण्यात येणार असल्यामुळे ही योजना बंद करण्याचा शासनाचा विचार असल्याने विदर्भ सधन सिंचन योजनेला घरघर लागली आहे. विदर्भातील कोरडवाहू जमिनीची उत्पादनक्षमता वाढविण्याच्या उद्देशाने केंद्र शासनामार्फत पाच वर्षांसाठी विदर्भ सधन सिंचन विकास कार्यक्रमांतर्गत सूक्ष्म सिंचनाची उपयोजना राबविण्यात आली. विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला होता. या योजनेंतर्गत शेतकर्‍यांना किमान दोन हेक्टरपर्यंत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकर्‍यांना खर्चाच्या ७५ टक्के, तर सर्वसाधारण शेतकर्‍यांना ५0 टक्के अनुदान दिले जाते. गेल्या चार वर्षांत या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी ३ लाख ७९ हजार २७६ शेतकर्‍यांनी ऑनलाइन अर्ज केले होते, त्यापैकी ३ लाख ३६ हजार ८८४ शेतकर्‍यांचे अर्ज पात्र ठरविण्यात आले. त्यासाठी ६५४ कोटी ६३ लाख ७५ हजार एवढा निधी आवश्यक होता. त्यापैकी ३२0 कोटी ५४ लाख ५0 हजार रुपये म्हणजेच ५0 टक्के निधी उपलब्ध झाला. परंतु कृषी विभागाने पात्र अर्जापैकी १ लाख ४९ हजार ३२५ अर्जधारक शेतकर्‍यांना पूर्वसंमती दिली होती. पैकी १ लाख ४७ हजार ८७७ अर्ज निकाली काढून, त्यांना ३२२ कोटी ५९ लाख रुपये एवढा निधी अनुदानापोटी दिला. यात जिल्हा नियोजन समितीतून २ कोटी ४ लाख ५ हजार रुपयांचा समावेश आहे. पूर्वसंमती दिलेल्या ८६७ अर्जधारक शेतकर्‍यांना २ कोटी ६0 लाख २४ हजार रुपये, पूर्वसंमती न दिलेल्या १ लाख २६ हजार ६८३ अर्जधारक शेतकर्‍यांना २५0 कोटी ८६ लाख ७ हजार रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. २0१२-१३ मध्ये आलेल्या सर्व अर्जधारक शेतकर्‍यांना सूक्ष्म सिंचनाचे अनुदान देण्यात आले. परंतु यंदा पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत सूक्ष्म सिंचन योजना राबविण्यात येणार आहे. शासनाकडून विदर्भ सधन सिंचन योजनेला मंजुरी नसल्याने ही योजना बंद होण्याच्या मार्गावर असल्याचे समजते.जिल्हानिहाय प्रलंबित अर्ज व रक्कमबुलडाणा ४४,५७५ (१११ कोटी ९१ लाख ३ हजार रुपये), अकोला १६,0२२ (३१ कोटी १७ लाख ५२ हजार), वाशिम १९,३३४ (२८ कोटी १४ लाख ७ हजार), अमरावती १९,0३७ (३७ कोटी १७ लाख ५२ हजार), यवतमाळ १२,९७९ (१८ कोटी ६ लाख ८२ हजार), वर्धा ८0१७ (१२ कोटी ३२ लाख २९ हजार), नागपूर ३४७६ (७ कोटी ७0 लाख १४ हजार), भंडारा ५४३ (७७ लाख ८४ हजार), गोंदिया २0६ (४९ लाख १८ हजार), गडचिरोली १९ (८२ हजार रुपये).वर्ष                      शेतकरी संख्या            प्रलंबित असलेली अनुदानाची रक्कम२0१३-१४            १११८८                      ३२ कोटी ७0 लाख ६७ हजार रुपये२0१४-१५            ३८६0५                      १0६ कोटी ४0 लाख १७ हजार रुपये२0१५-१६             ७७७५७                      ११४ कोटी ३५ लाख ४७ हजार रुपये