राजकीय नेत्यांच्या हालचालीवर 'त्या' एका व्यक्तीचं बारकाईनं लक्ष; अजितदादा कुणाबद्दल असं बोलले?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 12:00 PM2023-01-10T12:00:19+5:302023-01-10T12:00:54+5:30

अजितदादांच्या या विधानावर सभागृहात हशा पिकला. टाळ्यांचा गडगडाट झाला

When Ajit Pawar told the story of the Car driver in the hall, everyone started laughing | राजकीय नेत्यांच्या हालचालीवर 'त्या' एका व्यक्तीचं बारकाईनं लक्ष; अजितदादा कुणाबद्दल असं बोलले?

राजकीय नेत्यांच्या हालचालीवर 'त्या' एका व्यक्तीचं बारकाईनं लक्ष; अजितदादा कुणाबद्दल असं बोलले?

googlenewsNext

मुंबई - वडील दौऱ्यावर जायचे त्यावेळी त्यांची गाडी होती त्यावर ड्रायव्हर म्हणून सुनील तटकरे काम करायचे. दुसरा ड्रायव्हर न ठेवला मुलाला वाहन चालवायला ठेवले. तटकरे केवळ गाडी चालवत नव्हते, पुढून येणारी वाहने बघत नव्हते तर त्याचसोबत कान सगळे वडिलांजवळ होते. वडील काय करतात, कुणाशी बोलतायेत. कसं बोलतायेत, कशापद्धतीने उत्तर देतायेत हे बघत होते. व्यासपीठावर बसलेले आणि पुढे असणाऱ्यांना ठाऊक असेल आपल्या सगळ्यांची बारकाईनं जर कुणाला माहिती असेल तर ती आपल्या ड्रायव्हरला असते असं विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले. 

अजित पवार यांनी म्हटलं की, आपल्या घरातल्यांनीही जी माहिती नसते ती माहिती ड्रायव्हरला असते. हा बाबा कुठे गेला. कुठे थांबला, कितीवेळ थांबला. रुम कशा बदलल्या, कुठल्या रुममध्ये शिरला आणि कुठल्या रुममधून बाहेर पडला असं त्यांनी सांगितले. अजितदादांच्या या विधानावर सभागृहात हशा पिकला. टाळ्यांचा गडगडाट झाला तेव्हा तुम्ही एवढ्या टाळ्या वाजवता म्हणजे तुमच्या मनाला पटलंय असं गंमतीशीर म्हटलं. 

सुनील तटकरे यांनी सभागृहात केलेल्या भाषणाचा संग्रह केलेले पुस्तक प्रकाशन अजित पवारांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. वडिलांच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून सुनील तटकरे काम करायचे. साहजकिच राजकीय चर्चा गाडीत व्हायची. राष्ट्रवादी पक्षात जिल्ह्यात काय घडतंय हे त्यांना माहिती पडते. त्यांना ती सवयच लागली आहे. दिल्लीला असले तरी रायगडमध्ये, माणगावमध्ये, रोह्यात काय चाललंय, राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात काय चाललंय? सगळं माहिती असते. हे माहिती असलं पाहिजे जेणेकरून तुम्हाला पुढचे निर्णय घेणेही सोप्पं होतं असंही अजित पवारांनी सांगितले. 

दरम्यान, तटकरे कोकणातील आहेत. कोकणातील लोकांना गोष्टी ऐकायला आणि सांगायला फार आवडतात. कोकणी माणसांचा गोष्टी वेल्हाळपणा तटकरे यांनी पुरेपूर उचलला आहे. विधीमंडळ किंवा विधीमंडळाच्या बाहेरची भाषणे ऐकल्यावर त्यांच्या ज्ञानाची, गुणांची, नेतृत्व, कर्तृत्व आणि वक्तृत्व याची सगळ्यांना खात्री पटते. साहेबांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विधीमंडळातील भाषण ऐकले तर माझ्यासारख्या अनेकांच्या लक्षात आले की, त्यांच्या हातामध्ये कागदाची एक चिठ्ठी न घेता तासभर ओघवतं भाषण करण्याची त्यांची शैली आहे. पवारसाहेबांच्या जीवनातील अनेक प्रसंग त्यांनी सांगितले ते उभ्या महाराष्ट्राने पाहिले असेही अजित पवार म्हणाले. 
 
 

Web Title: When Ajit Pawar told the story of the Car driver in the hall, everyone started laughing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.