नाशिक : कारच्या बोनटमध्ये तर दुचाकीच्या सिटखाली साप आढळला अशा बातम्या अनेकदा कानावर पडतात; मात्र नाशिकच्या चेतनानगर परिसरात इंडियन कोब्रा जातीचा नाग चक्क सायकलवर स्वार झाल्याचे चित्र दुपारी चार वाजेच्या सुमारास पहावयास मिळाले. सायकलवर कोब्रा चढला आणि फना काढून रुबाबदारपणे त्याने बंगल्यातील रहिवाशांना पोझ दिली; मात्र त्याचा हा रुबाब नागरिकांना आकर्षित करणारा नव्हे तर दहशतीखाली आणणारा होता.नाशिकच्या चेतनानगर परिसरात एका बंगल्यामध्ये शेजारच्या मोकळ्या भूखंडावरून ‘इंडियन कोब्रा’ने हजेरी लावली. कुंपणाच्या भिंतीला लागून उभ्या असलेल्या सायकलवरच कोब्रा स्वार झाला अन् सायकलच्या रिंगमधील तारांमध्ये अडकला. बंगल्याच्या संरक्षण कुंपणाच्या आतमध्ये नाग फिरत असल्याचे लक्षात आल्यानंतर रहिवाशांनी तत्काळ ‘इको-एको’ या प्राणीप्रेमी संस्थेच्या स्वयंसेवकांशी संपर्क साधला. त्यानंतर स्वयंसेवक अभिजित महाले यांनी बंगल्यात जाऊन नाग सुरक्षितरित्या ‘रेस्क्यू’ केला व त्याची नोंद वनविभागाच्या पश्चिम कार्यालयात केली. लवकरच शहरापासून दुर जंगलाच्या परिसरात नागाला सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.
...जेव्हा नाशिकमध्ये चक्क सायकलवर स्वार होतो ‘इंडियन कोब्रा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 4:29 PM
सध्या प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन असल्यामुळे सापाचा व्हिडिओ किंवा फोटो काढण्याचा मोह करु नये. कारण वन कायद्यानुसार सापाचे व्हिडिओ अथवा फोटो काढून सोशल मिडियावर पोस्ट करणे गुन्हा ठरतो. तसेच फोटो-व्हिडिओ काढताना सापाकडून संबंधिताला धोकाही उत्पन्न होऊ शकतो.
ठळक मुद्देचेतनानगर परिसरात एका बंगल्यामध्ये शेजारच्या मोकळ्या भूखंडावरून ‘इंडियन कोब्रा’ने हजेरी लावली जमिनीमधील पाण्याची उन्हामुळे वाफ होऊ लागल्याने बिळामध्ये राहणारे सर्प बाहेर