शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण कोरियात मार्शल लॉची घोषणा, राष्ट्रपती यून सुक-योल म्हणाले, "देशविरोधी शक्तींचा अंत होईल"!
2
Video: विनोद कांबळीला पाहताच सचिन तेंडुलकर भेटायला गेला, त्याला पाहून 'बालमित्र' भावूक झाला...
3
अंबाजोगाईत साडे दहा लाखांचा गुटखा पकडला; शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; दोघे ताब्यात
4
शेतातील शेडवर छापा; २ लाखांचा गुटख्या जप्त, एक ताब्यात; दहशतवादविराेधी शाखेची कारवाई
5
अपहरण झालेल्या दाेन मुलींची हैदराबादमधून सुटका; दाेन आराेपी अटकेत, AHTU शाखेची कारवाई
6
अमरावती विद्यापीठात अधिष्ठाता पदभरतीतून आरक्षणाचा ‘बिंदू’ गायब, अखेर 'ती' जाहिरात रद्द
7
संभल हिंसाचाराचं पाकिस्तान कनेक्शन! 3 पुरावे ओरडून-ओरडून देतायत साक्ष; फॉरेन्सिक टीमनं नाल्या खंगाळल्या
8
“निवडणुकीत आम्हाला थर्ड अंपायर मिळाला असता तर अनेक निकाल बदलले असते”: राज ठाकरे
9
UPI मुळे ATM ला फटका! 5 वर्षात प्रथमच एटीएमची संख्या घटली; ग्रामीण भागात काय स्थिती?
10
वाह.. क्या बात है! विराट-रोहितची एकत्रित नेट प्रक्टिस पाहायला ऑस्ट्रेलियन फॅन्सची गर्दी (Video)
11
निर्मला सीतारामन यांना मोठा दिलासा; कर्नाटक हायकोर्टाने रद्द केला 'इलेक्टोरल बाँड'चा खटला...
12
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना भेटण्यासाठी देवेंद्र फडणवीस 'वर्षा'वर; नेमकी कोणती चर्चा झाली?
13
7 कॅबिनेट मंत्रीपदं, दोन राज्यमंत्रीपदं, एक राज्यपालपद अन्...; अजित दादा काय-काय मागणार?
14
“...तर एकनाथ शिंदे कधी उद्धव ठाकरेंना सोडून बाहेर पडले नसते”; भाजपा नेत्याची टीका
15
"आपणच सर्व उत्तरं द्या...!"; मोदी सरकारमधील मंत्र्यांवर का नाराज झाले ओम बिरला? भरसंसदेत म्हणाले...
16
Pappu Yadav : मोठा खुलासा! पप्पू यादव यांना सुरक्षा मिळावी म्हणून जवळच्यांनी रचला 'धमकीचा ड्रामा'
17
Airtel आणि Jio चा 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लॅन; मिळेल फास्ट इंटरनेट
18
निर्मला सीतारामन जिथे 'निरीक्षक' म्हणून गेल्या, तिथे कसा होता भाजपाचा मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला?
19
“मोदी-शाह, १० हजार लाडक्या बहिणी, २ हजार शेतकरी शपथविधीला येणार”; भाजपा नेत्याने यादीच वाचली
20
"आम्ही कधीही लग्न करणार नाही’’, १२ तरुणींनी घेतला अजब निर्णय, कारण काय? 

एकनाथ शिंदे आमदारांसह सूरतला गेले हे खासदार श्रीकांत शिंदेंना कधी कळलं? 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2024 8:39 AM

संघर्षातून एकनाथ शिंदे पुढे आलेत. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मला आले नाहीत अशा शब्दात श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरेंवर पलटवार केला. 

ठाणे -  Shrikant Shinde Interview ( Marathi News ) मी ठाण्याला घरी होतो, मतदारसंघात फिरत होतो. सर्व शिवसैनिक, पदाधिकारी यांना विश्वास देण्याचं काम करत होतो. मूळात एकनाथ शिंदे जाणार हे मला माहिती नव्हते. १९ जूनला आमदारांसोबत साहेब गेले तेव्हा मलाही माहिती नव्हते असं सांगत खासदार श्रीकांत शिंदेंनी घटनाक्रम सांगितला. 

ठाण्यातील युवासेनेच्या कार्यक्रमात गायक अवधूत गुप्ते यांनी श्रीकांत शिंदे यांची मुलाखत घेतली. त्यात ते म्हणाले की, मी न्यूजमध्ये पाहिले तेव्हा घटनाक्रम कळाले. मला खासदार हेमंत गोडसेंचा फोन आला. एकनाथ शिंदे सूरतला गेलेत. मी म्हटलं कुठे चेष्टा करताय, मी कामात आहे. पण ते बोलले न्यूज बघा, मी न्यूज चॅनेल सुरू केला. तेव्हा हे कळाले. एकनाथ शिंदे प्लॅनिंग करून गेले नव्हते. त्यांच्यासोबत ज्या गोष्टी घडत होत्या. त्यामुळे त्यांनी तसा निर्णय घेतला आणि जो निर्णय घेतला त्याला शेवटापर्यंत घेऊन जाण्याचे काम केले असं त्यांनी म्हटलं. 

तसेच मी रोज भेटायचो, पण आम्हाला याबाबत काहीच माहिती नव्हते. एकनाथ शिंदे यांनी रिस्क घेतली होती. त्यांच्यावर विश्वास ठेऊन आमदार, मंत्री त्यांच्यासोबत गेले. हे जर घडले नाही तर पुढे काय होईल हे माहिती नव्हते. मुलगा म्हणून मला टेन्शन आलं होते. वडिलांची काळजी होती. कुटुंबातील लोक, सहकारी सगळ्यांना उद्या काय होणार हे कळत नव्हते. गेले अनेक वर्ष रिस्क घेऊन ते शिवसेना वाढवत होते. तशीच बाळासाहेबांचे विचार वाचवण्यासाठी शिंदेंनी रिस्क घेतली आणि आज आपण पाहतोय, मुख्यमंत्रिपदाला १०० टक्के न्याय देण्याचं काम एकनाथ शिंदे करत आहेत असं श्रीकांत शिंदेंनी सांगितले. 

दरम्यान, गेल्यावेळी एकाला मंत्री करण्यासाठी किती तडजोडी केल्या गेल्या. आज एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. राजा का बेटा राजा नही बनेगा. जो काबील होगा वही राजा बनेगा असं मी म्हणतो. सर्वोच्च पद हे कुणासाठी राखीव नसते. जो मेहनत करेल, पक्षाला वेळ देईल, लोकांचा विश्वास जिंकेल अशा युवकांना त्यापदावर पोहचवण्याचं काम आम्हाला करायचे आहे. पूर्वी सर्वोच्च पद २ जणांसाठी राखीव होती. आता ती परिस्थिती नाही.आज पक्षात कुठलेही पद राखीव नाही. पक्षात लाभाचे पद मी कधी घेणार नाही. आमच्यावर विश्वास ठेऊन जे आलेत त्यांना ती संधी आहे. वेगवेगळ्या युवकांना संधी मिळाली तर पक्ष घराघरात पोहचू शकतो असं म्हणत श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंवर टीका केली. 

अपघाताने राजकारणात आलो

मी राजकारणात अपघाताने आलोय, मला राजकारणात रस नव्हता. पक्षाला गरज होती तेव्हा मी आलो. २०१४ मध्ये मला कल्याण लोकसभेतून उमेदवारी दिली. आज मी डॉक्टर आहे, राजकारणाच्या माध्यमातून मी फाऊंडेशनचं काम करतो. हजारो रुग्णांची सेवा करण्याचं काम केले जाते. कल्याणमध्ये आपला उमेदवार दुसऱ्या पक्षात गेला होता. त्यावेळी पक्षाने मला तिथे उभे केले. तिथे अडीच लाखाच्या फरकाने निवडून आलो. त्यानंतर कल्याण मतदारसंघात मी काम करत राहिलो. २०१९ ला ३ लाखांच्या फरकाने निवडून आलो असं श्रीकांत शिंदेंनी म्हटलं. 

आदित्य ठाकरेंवर पलटवार

आव्हान कोणाचं स्वीकारायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. पण आव्हान कोण करतंय हे पाहावे लागेल. प्रत्येकाचं आव्हान स्वीकारत बसले तर उत्तर देण्यात वेळ जाईल. एकनाथ शिंदे पुढे काम करत जातायेत, मागे कोण काय बोलतंय याकडे लक्ष देत नाही. जे टीका करतायेत, त्यांची योग्यता काय, बोलतोय काय हे कळत नाही. संघर्षातून एकनाथ शिंदे पुढे आलेत. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मला आले नाहीत अशा शब्दात श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरेंवर पलटवार केला. 

टॅग्स :Shrikant Shindeश्रीकांत शिंदेEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेAaditya Thackerayआदित्य ठाकरे